Home /News /career /

Army Jobs: भारतीय लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

Army Jobs: भारतीय लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

इंडियन आर्मी भरती 2022

इंडियन आर्मी भरती 2022

भारतीय लष्कराच्या (Indian Army) जबलपूर येथील ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरने 10वी उत्तीर्ण तरुणांकडून भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

    नवी दिल्ली, 28 मार्च: भारतीय सैन्यदलांत नोकरी करावी आणि देशसेवा करावी अशी अनेक तरुण-तरुणींची इच्छा असते. पण त्यासाठी परीक्षा देऊन योग्य शारिरीक क्षमता सिद्ध करून सैन्य दलात पोहोचावं लागतं. भारतीय लष्करात वेगवेगळ्या पदांवर भरती होत असते. त्यामुळे अनेक जण त्याबद्दलच्या जाहिरातीची वाटच पहात असतात. भारतीय लष्करात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय लष्कराच्या (Indian Army) जबलपूर येथील ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटरने 10वी उत्तीर्ण तरुणांकडून भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इंडियन आर्मीने या संदर्भातील (Indian Army Recruitment 2022) अधिकृत अधिसूचनादेखील जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार या भरती प्रक्रियेअंतर्गत कूक, न्हावी, रेन्ज चौकीदार यासारख्या विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. ते इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट indianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. 'आज तक'ने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. JOB ALERT: इंडियन लॉ सोसायटी पुणे इथे ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी मोठी संधी अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा अर्ज प्रक्रिया सुरु झालेली तारीख : 28 मार्च 2022 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 1 मे 2022 रिक्त पदांची नावे आणि संख्या कूक - 9 पदं टेलर - 1 पद रेन्ज चौकीदार - 1 पद न्हावी - 1 पद सफाई कर्मचारी - 2 पदं निवड झालेल्या उमेदवारांना मिळेल एवढा पगार कूक – 19,900 ( लेव्हल-2) टेलर – 18,000 (लेव्हल-1) रेन्ज चौकीदार – 18,000 (लेव्हल -1) न्हावी – 18,000 (लेव्हल -1) सफाई कर्मचारी – 18,000 (लेव्हल -1) आवश्यक शैक्षणिक पात्रता कूक - या पदांवर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयासह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. टेलर - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्याने मान्यताप्राप्त संस्थेतून टेलर म्हणून आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. रेन्ज चौकीदार - या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित विषयातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांना कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव असावा. न्हावी - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याला न्हावी म्हणून एक वर्ष व्यावसाय किंवा नोकरीचा अनुभव असणे आवश्यक आहे. सफाई कामगार - या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसंच त्याला संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. Physical Education मध्येही आहेत करिअरच्या उत्तम संधी; हे कोर्सेस कराच या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. तसंच इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 3 वर्षांची आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सवलत देण्यात येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया या पदांसाठी इंडियन आर्मीकडून घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकतात. अर्ज करताना संबंधित कागदपत्रं आणि तपशील शेवटच्या तारखेपूर्वी 'कमांडंट, ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर (एम.पी.) पिन - 482001' वर सीलबंद कव्हरमध्ये पाठवावा लागेल. हे लक्षात ठेवा की या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 1 मे 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. अशी असेल उमेदवारांची निवड प्रक्रिया पात्र अर्जदारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत जनरल इंटिलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा आणि कॉम्प्रिहेन्शन या विषयांवरील प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाईल. तुम्हीही लष्करात सहभागी होऊ इच्छित असाल तर लगेच अर्ज पूर्ण करून पाठवा.
    First published:

    Tags: Career opportunities, Indian army, Job alert

    पुढील बातम्या