नवी दिल्ली, 29 जानेवारी : देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक यूपीएससी परिक्षेत लाखो उमेदवार दरवर्षी जीवतोड मेहनत करुन परीक्षा देत असतात. मात्र, खूप कमी जण या परिक्षेत पास होत असतात. आज अशाच एका यशस्वी तरुणीचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि या अधिकारी तरुणीचे नाव आहे, डॉ. अपाला मिश्रा.
IFS अपाला मिश्रा यांचा जन्म 1997 मध्ये गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे झाला. त्या लष्करी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील अमिताभ मिश्रा कर्नल आहेत. त्यांचा भाऊ अखिलेश मिश्रा हे देखील सैन्यात मेजर आहेत. तर त्यांच्या आई डॉ. अल्पना मिश्रा या दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसच्या हिंदी विभागात प्राध्यापक आहेत.
अपाला मिश्रा यांनी डेहराडूनमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी रोहिणी, दिल्ली येथून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अपालाने आर्मी कॉलेजमधून बीडीएस केले आहे, त्यानंतर डेंटिस्टची पदवी मिळवली आहे. त्यांना नेहमीच समाजासाठी काम करायचे होते आणि म्हणूनच त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - Success Story : IIT पास, UPSC मध्ये दुसरा क्रमांक, शेतकऱ्याची मुलगी झाली IAS अधिकारी
IFS अपाला मिश्रा यांनी प्रॅक्टिस सोडून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी दोनवेळा UPSC प्रिलिम्स परीक्षेत अपयश आले. मात्र, त्यानंतर अपाला यांनी तिसऱ्या प्रयत्नात 9 वा क्रमांक मिळवून त्यांनी आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. त्यांना UPSC मुलाखतीत 275 पैकी 215 गुण मिळाले. त्यांनी 5 वर्षात सर्वाधिक स्कोअर केला होता.
IFS अपाला मिश्रा सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर चांगल्याच सक्रिय असतात. यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान त्या 7-8 तास अभ्यास करायच्या. पहिल्या दोन प्रयत्नांत झालेल्या चुकांचे विश्लेषण करून त्यांनी योग्य रणनीती आखली. मग वेळेचे व्यवस्थापन आणि त्याच्या चुका सुधारून त्यांनी यूपीएससी टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Success story, Upsc