नाशिक, 16 ऑगस्ट: इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक (India Security Press Nashik) इथे लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer)
शैक्षणिक पात्रता
जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer) - MBBS / MD पर्यंत शिक्षण असणं आवश्यक. तसंच शासकीय रुग्णालयातील अनुभव आवश्यक.
हे वाचा - सुवर्णसंधी! पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये तब्बल 395 जागांसाठी मेगाभरती
इतका मिळणार पगार
जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer) - 55,000/- - 75,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ता
चीफ जनरल मॅनेजर, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Nashik