भारताला पहिल्यांदा मिळाला मान; सोलापूरातील ZP शाळेच्या शिक्षकाला 7 कोटींचा Global Teacher पुरस्कार जाहीर

भारताला पहिल्यांदा मिळाला मान; सोलापूरातील ZP शाळेच्या शिक्षकाला 7 कोटींचा Global Teacher पुरस्कार जाहीर

देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

  • Share this:

सोलापूर, 3 डिसेंबर : शाळा ही पहिली गुरू आहे असं म्हणतात. शिक्षक शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला घडवतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील (Solapur ZP school teacher awarded globally) शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjeet singh disle) यांना 7 कोटी (7 crores) रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

आतापर्यंत देशातील कोणत्याही शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला नाही. तर भारताला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात ते ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मेहनतीमुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. हा हा पुरस्कार सोलापूरातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांना तब्बल 7 कोटी रुपयांचा निधीही मिळाला आहे. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम येथे झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. (India gets honor for the first time 7 crore Global Teacher Award ) असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

हे ही वाचा-भररस्त्यात गुंडगिरी; बेदम मारहाणीचा Video व्हायरल झाला तरी पोलिसांकडून दुर्लक्ष

जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 3, 2020, 8:14 PM IST

ताज्या बातम्या