मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

INTERVIEW दिल्यावर या गोष्टी नक्की करा, लवकरच मिळेल OFFER LETTER

INTERVIEW दिल्यावर या गोष्टी नक्की करा, लवकरच मिळेल OFFER LETTER

 नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत चांगली (Important things to do after job interview) होण्यासोबत त्यानंतरच्या काही गोष्टीदेखील महत्त्वाच्या असतात.

नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत चांगली (Important things to do after job interview) होण्यासोबत त्यानंतरच्या काही गोष्टीदेखील महत्त्वाच्या असतात.

नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत चांगली (Important things to do after job interview) होण्यासोबत त्यानंतरच्या काही गोष्टीदेखील महत्त्वाच्या असतात.

  • Published by:  desk news

मुंबई, 29 ऑक्टोबर : नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत चांगली (Important things to do after job interview) होण्यासोबत त्यानंतरच्या काही गोष्टीदेखील महत्त्वाच्या असतात. अनेकांना मुलाखत झाली म्हणजे सगळं काही झालं, असं वाटतं. त्यानंतर कंपनीकडून फोन येईपर्यंत वाट पाहत बसण्याशिवाय (Don’t just wait for call) आपल्याकडे काहीच पर्याय नाही, असं लोकांना वाटतं. त्यामुळं चांगली मुलाखत होऊनही अनेकांना कंपनीकडून फोन येत नाही.

मुलाखतीनंतरची औपचारिकता

मुलाखत देऊन झाल्यानंतर काही गोष्टी आणि शिष्टाचारांचं पालन करण्याची गरज असते. अर्थात, या गोष्टी बंधनकारक नसतात. मात्र त्या केल्याने इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचं वेगळेपण आणि उत्साहीपणा मुलाखतकर्त्यांना आणि कंपनीला दिसून येत असतो. मुलाखत संपल्यानंतर कंपनीशी पूर्ण संपर्क न तोडता कुठल्या ना कुठल्या प्रकारे कंपनीच्या संपर्कात राहणे आणि फॉलोअप घेत राहणे गरजेचे आहे.

अवाजवी मागण्या टाळा

मुलाखत झाल्यानंतर आपल्या मागण्यांमध्ये आणि अपेक्षांमध्ये बदल करणं अयोग्य आहे. कामाच्या वेळा, तुमच्या शिफ्ट, कामाचं स्वरूप या बाबींवर तुमच्या मुलाखतीदरम्यान चर्चा झालेली असते. त्याचवेळी तुम्ही तुमच्या पगाराच्या अपेक्षेबाबतही विचारणा करण्यात येते आणि तुम्ही तुमची अपेक्षा सांगत असता. एकदा मुलाखत झाल्यानंतर पुन्हा पगाराची अपेक्षा बदलणे किंवा कामाच्या स्वरुपात बदल अपेक्षित असणे, या गोष्टी तुमच्याविषयी वाईट मत तयार करणाऱ्या ठरू शकतात. त्यामुळे मुलाखत झाल्यानंतर तुमच्या बदललेल्या अपेक्षांविषयी कधीही एचआर किंवा संभाव्य बॉससोबत न बोलणंच चांगलं.

धन्यवाद द्यायला विसरू नका

ज्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी तुमची मुलाखत घेतली आहे, त्यांना ईमेल करून धन्यवाद देण्याची औपचारिकता पूर्ण करणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मुलाखत झाल्यानंतर काही दिवस होऊनही त्याबाबत तुम्हाला काहीच प्रतिसाद येत नसेल, तर ईमेलवरून त्याबाबत चौकशी करणं, गरजेचं आहे. त्यामुळे तुमची प्रतीक्षाही कमी होते आणि तुमची निवड झाली नसेल, तरीही ही वस्तुस्थिती लवकरच समजल्यामुळे इतर प्रयत्नांसाठी तुम्ही रिकामे होता.

हे वाचा- ZOMATO वर तमिळ नागरिक संतापले, एका वाक्यामुळं खवळलं अख्खं राज्य

चेकलिस्ट तयार करा

अनेक कंपन्या मुलाखतीनंतर काही दिवसांनी तुमच्याकडे रेफरन्स मागतात. त्यासाठीची यादी तुम्ही अगोदरच तयार ठेवली, तर कंपनीकडून रेफरन्स दिलेल्या व्यक्तींशी बोलण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होते. त्यामुळे तुमची प्रतिक्षाही कमी होते.

First published:

Tags: Career, Employment, Job