मुंबई, 03 डिसेंबर: IIT कॉलेजेसढे सध्या कॅम्पस प्लेसमेंट्स सुरु आहेत. दरवर्षी IIT चे प्लेसमेंट्स म्हंटलं की कंपन्यांकडून विद्यार्थ्यांवर पेकेजेसची लूट होत असते. पण या वर्षी मात्र कंपन्यांच्या पॅकेजने संपूर्ण रेकॉर्ड्स मोडले आहेत. IIT मुंबई, कानपुर आणि दिल्लीच्या काही विद्यार्थ्यांना लाखोंमध्ये नाही तर कोट्यवधींचे पॅकेजेस मिळाले आहेत. तर तीन विद्यार्ह्यांना तब्बल तब्बल 4 कोटींचं पॅकेज मिळालं आहे. एक सामान्य माणूस आपला संपूर्ण आयुष्यात जितके पैसे कमावणार नाही तितके पैसे या विद्यार्थ्यंना वर्षभरात मिळणार आहेत. त्यामुळे भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय
आयआयआयटी प्लेसमेंटमध्ये ऑफर केलेल्या नोकर्या, त्यांच्या पगाराची रक्कम बर्याच काळासाठी चर्चेत राहते. या वर्षी III प्लेसमेंट देखील 1 डिसेंबर पासून सुरू झाले आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या प्लेसमेंटमधील सर्वाधिक वेतन पॅकेज 4 कोटी आहे. हे पॅकेज 3 विद्यार्थ्यांना मिळाले आहे. हे तीन विद्यार्थी आयआयटी दिल्ली, बॉम्बे आणि कानपूरचे आहेत.
आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्याला न्यूयॉर्कच्या जेन स्ट्रीट कंपनीने चार कोटींचे पॅकेज दिले आहे. IIT मद्रासच्या 25 विद्यार्थ्यांना 1 कोटींहून अधिक वार्षिक वेतन पॅकेजही ऑफर करण्यात आले आहे.
Mega Job Alert: 1-2 नव्हे तब्बल 13,404 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती; संधी सोडू नका; करा अप्लाय
या वर्षी माझ्या नियुक्त्यांमध्ये Microsoft, Graviton, Flipkart, Texas Instruments, Bajaj Auto, Bain and Company, Goldman Sachs, Qualcomm, Boston Consulting Group, JP Morgan Chase & Co, P&G, Optiver, Morgan Stanley आणि McKinsey यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी कॅब एग्रीगेटर उबेर कंपनीने सर्वाधिक 2.16 कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. या वर्षी IIT मद्रासमध्ये 15 विद्यार्थ्यांना रुब्रिक, कोहेसिटी आणि ऑप्टिव्हर सारख्या कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या. आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांनी 1.06 कोटी रुपयांच्या सहा ऑफरसह सर्वाधिक ऑफर मिळवल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.