• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • IIT Bombay Course: IIT मुंबईकडून जगातील 'या' ट्रेंडिंग विषयांवर ऑनलाईन कोर्स; कोणीही करू शकतं अप्लाय

IIT Bombay Course: IIT मुंबईकडून जगातील 'या' ट्रेंडिंग विषयांवर ऑनलाईन कोर्स; कोणीही करू शकतं अप्लाय

कोर्सेरा (Coursera) या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मपैकी (Online Learning Platform ) एक असलेल्या प्लॅटफॉर्मसोबत पार्टनरशिप करून हे कोर्सेस ऑफर केले जात आहेत.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑक्टोबर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेनं (IIT Bombay) डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोटर्स फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EVs) हे दोन नवीन सर्टिफिकेशन कोर्सेस सुरू केले आहेत. कोर्सेरा (Coursera) या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मपैकी (Online Learning Platform ) एक असलेल्या प्लॅटफॉर्मसोबत पार्टनरशिप करून हे कोर्सेस ऑफर केले जात आहेत. लाइव्ह लेक्चर्ससह चार महिन्यांचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्टिफिकेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या नॉन-आयटी व्यवस्थापकांसाठी डिझाइन केलं आहे. अभ्यासक्रम नवीन तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक अंमलबजावणीद्वारे संस्थेमध्ये परिवर्तन करण्याच्या संधी कशा ओळखाव्यात आणि योग्य उपायांची अंमलबजावणी कशी करावी. तसंच analytical skills कशी तयार करावीत याबाबत या कोर्समध्ये सांगण्यात येणार आहे, असं Coursera नं म्हंटलं आहे. हा सर्टिफिकेशन कोर्स आयआयटी बॉम्बे इथल्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. राजेंद्र सोनार शिकवतील. उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ नाव सुहृद ब्रह्मा हे या कार्यक्रमासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी असतील. कठीण प्रशिक्षणानंतर बनतात IPS अधिकारी; उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना इतका असतो पगार पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोटर्स फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EVs), हा साडे चार महिन्यांचा सर्टिफिकेशन प्रोग्रॅम आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये निर्माण करण्यात मदत करणे हा आहे. भारताच्या वाहतूक भविष्यासाठी अनुकूल केलेल्या नवीन सोल्यूशन्सच्या डिझाईन आणि विकासाबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं यासाठी हा कोर्स डिझाईन करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोटर डिझाईन, पॉवर कन्व्हर्टर डिझाईन आणि मोटर ड्राइव्ह या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हा कार्यक्रम आयआयटी बॉम्बे इथले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. बी. जी. फर्नांडिस, डॉ. किशोर चॅटर्जी आणि डॉ. संदीप आनंद शिकवतील. या कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांना IIT Bombay च्या ऑफिशचीला वेबसाईला भेट द्यावी लागणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: