मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IIM मध्ये Admission चा गोल्डन चान्स सोडू नका; IIM CAT 2022 रजिस्ट्रेशनसाठी अवघे 2 दिवस शिल्लक

IIM मध्ये Admission चा गोल्डन चान्स सोडू नका; IIM CAT 2022 रजिस्ट्रेशनसाठी अवघे 2 दिवस शिल्लक

 IIM CAT 2022

IIM CAT 2022

अवघ्या दोन दिवसात या परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हीही या परीक्षेसाठी अर्ज केला नसेल तर लगेच करा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 सप्टेंबर: MBA करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IIM CAT ही परीक्षा महत्त्वाची असते. ही परीक्षा क्रॅक केल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट मधून MBA करण्याची संधी मिळते. यंदा ही परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरु आहेत. अवघ्या दोन दिवसात या परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हीही या परीक्षेसाठी अर्ज केला नसेल तर लगेच करा.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) 2022 परीक्षा घेतली जाते. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in द्वारे अर्ज करू शकतात.

महिन्याचा तब्बल 2 लाख रुपये पगार तेही मुंबईत; MMRDA करणार ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती; लगेच करा अप्लाय

CAT 2022 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, विद्यार्थ्याला पदवीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. तथापि, अनुसूचित जाती, जमाती आणि भिन्न-अपंग उमेदवारांसाठी ते 45 टक्के आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 27 नोव्हेंबर 2022 रोजी तीन सत्रांमध्ये संगणक आधारित सामाईक प्रवेश परीक्षा 2022 (CAT 2022) आयोजित करेल. CAT परीक्षेचा निकाल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे. CAT 2022 स्कोअर 31 डिसेंबर 2022 पर्यंत वैध असेल.

किती असेल अर्ज शुल्क

ऑनलाइन नोंदणीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2300 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे, तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1150 रुपये असेल.

तुम्हीही ऑनलाईन बिझिनेस सुरु करण्याचा विचार करताय? जरा थांबा; 'या' गोष्टी वाचाच

असं करा रजिस्ट्रेशन

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.

येथे 'New Candidate Registration' वर क्लिक करा.

अर्ज भरून सबमिट करा.

अर्ज फी भरा.

भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Jobs Exams