करिअर निवडण्याआधी ओळखा स्वतःला

आवड, व्यक्तिमत्त्व आणि योग्यता तपासल्यानंतरच करा करिअरची निवड

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 03:52 PM IST

करिअर निवडण्याआधी ओळखा स्वतःला

मुंबई, 6 जून - सद्याची पिढी ही भविष्यासंबंधी जास्त जागरूक झालेली आहे. परीक्षेचा निकाल लागण्याआधीच करिअर नेमकं कशात करायचं या दृष्टीने त्यांची तयारी सुरू झालेली असते. दहावी आणि बारावीनंतर करिअर निवडताना महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखण्याची.

करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी प्रथम आत्मविश्लेषण करणं हे फार आवश्यक असतं. त्यासाठी स्वतःचं विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यात असायला हवी. आपली आवड, व्यक्तिमत्त्व आणि स्वतःची योग्यता या सर्व गोष्टी तपासून त्यानंतरच करिअरची निवड करावी.

'या' कारणानं तणाव कमी होण्याऐवजी वाढतोच

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा निवडताना आपला स्वभाव कसा आहे याचासुद्धा विचार करायला हवा. आपण कल्पनाशील आहोत, शांत आहोत की साहसी आहोत याची तपासणी करायला हवी. तिसरी बाब म्हणजे करिअर निवडताना ज्या परीक्षा दिल्या जातात त्यांचं स्वरुप कसं आहे, त्यासाठी कोणकोणती तयारी करावी लागेल, यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळवणं महत्त्वाचं असतं.

उलट्या, चक्कर यांनी प्रवासात होतोय त्रास? 'हे' घरगुती उपाय करून पाहा

Loading...

वाढती स्पर्धा लक्षात घेऊन जे करिअर निवडणार असाल त्यांची उपयुक्तता आणि त्यासंदर्भातल्या सर्व शक्यता जाणून घ्यायला हव्या. असे अनेक विद्यार्थी असतात ज्यांच्यावर दहावी, बारावीचा निकाल लागताच कुटुंबाची जबाबदारी पडते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी असे कोर्सेस निवडावे जे लवकर रोजगार मिळवून देतील. रोजगार मिळवून देणारे असे अनेक लहान-लहान अभ्यासक्रम आहेत जे दोन वर्षात सरजपणे पूर्ण करता येतात.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: career
First Published: Jun 6, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...