मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IDBI बँकेत नोकरीची संधी; 134 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होणार भरती

IDBI बँकेत नोकरीची संधी; 134 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होणार भरती

या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे एकूण 134 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच केला जाऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आयडीबीआय बँकने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी (IDBI SO Recruitment 2020) वॅकेन्सी सुरू केली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2020 आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे एकूण 134 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच केला जाऊ शकतो.

अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आणि ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2020 आहे.

पदांची संख्या -

डीजीएम (ग्रेड डी) - 11 पद

एजीएम (ग्रेड सी) - 52 पद

मॅनेजर (ग्रेड बी) - 62 पद

असिस्टेंट मॅनेजर (ग्रेड ए) - 9 पद

निवड प्रक्रिया -

कोणत्याही पदासाठी निवड करताना, उमेदवाराचं शिक्षण आणि अनुभव याचं स्क्रिनिंग केलं जाईल. त्यानंतर निवड झालेल्यांना ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी फी -

सामान्य वर्गातील उमेदवारांना 700 रुपये फी भरावी लागेल. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 150 रुपये फी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर idbibank.in व्हिजिट करू शकतात.

- कोणताही उमेदवार केवळ एकाच पदासाठी, एका वॅकेन्सीसाठी अर्ज करू शकतो.

- उमेदवाराने फी भरल्यानंतरच रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचं मानलं जाईल.

- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने त्या-त्या पदांसाठी पात्रतेचे निकष वाचूनच पुढील अर्ज भरा.

- उमेदवारांनी याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरच idbibank.in अवलंबून राहावे.

- या पदांअंतर्गत निवड झाल्यास, उमेदवाराची पोस्टिंग देशभरात कुठेही केली जाऊ शकते.

First published:

Tags: Job