दहावी- बारावी निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी; ICSE बोर्डाचे निकाल उद्याच

दहावी- बारावी निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी; ICSE बोर्डाचे निकाल उद्याच

ICSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्याच घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. कसा आणि कधी पाहायचा रिझल्ट?

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जुलै : ICSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्याच घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने शुक्रवार 10 जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे. result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत  वेबसाईटवर उद्या दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education, CBSE) दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर आलं. त्यापाठोपाठ ICSE ने मात्र खरोखरच त्यांच्या निकालाच्या तारखेची घोषणा केली आहे.

कसा बघायचा निकाल

ICSE चा निकाल उद्या दुपारी 3 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. त्यासाठी https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या.

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर  https://www.cisce.org/ जा

तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा

त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा

Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल

इथे थेट तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 9, 2020, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading