नवी दिल्ली, 24 जुलै: राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर CBSE (CBSE board 10th Result date) आणि ICSE बोर्डाच्या (ICSE board 10th 12th result) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. त्यानुसार आता ICSE आणि ISC बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल आज म्हणजेच 24 जुलै 2021 ला बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official website) दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
cisce.org आणि result.cisce.org या दोन संकेतस्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डानं ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्याच्या कोणत्याही परीक्षा न घेता निकाल लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर हा निकाल लावला जाणार आहे.
हे वाचा - मोठी बातमी! शाळेचा अभ्यासक्रम 25 टक्क्यांनी कमी होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
असा बघा निकाल
1: विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org या संकेतस्थळाला भेट द्यावी
2: वेबसाइटवर दिलेल्या RESULT च्या लिंकवर क्लिक करावं.
3: याठिकाणी रोल नंबर आणि अन्य माहिती सबमिट करावी.
4: अचूक माहिती टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर निकाल दिसेल.
5: निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालाची प्रिंट घ्यावी, नंतर उपयोगात येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 10th class, Exam result