• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ICAR DOGR Recruitment: कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे इथे नोकरीची संधी; 35,000 रुपये पगार

ICAR DOGR Recruitment: कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे इथे नोकरीची संधी; 35,000 रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  पुणे, 11 ऑक्टोबर: कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे (ICAR- Directorate of Onion & Garlic Research Pune) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ICAR DOGR Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल  या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     यंग प्रोफेशनल (Young Professional II) -एकूण जागा 02 ICAR DOGR Recruitment 2021
  ICAR DOGR Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यंग प्रोफेशनल (Young Professional II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आनुवंशिकता आणि वनस्पतींचे प्रजनन/ कृषी. जैवतंत्रज्ञान/ जैवतंत्रज्ञान / फलोत्पादन / भाजीपाला विज्ञान यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना प्रयोगशाळेतील अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार यंग प्रोफेशनल (Young Professional II) - 35,000/- रुपये प्रतिमहिना हे वाचा-  महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल इथे दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती काही महत्त्वाच्या सूचना या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची मुलाखत ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख, वेळ आणि जागा ही ऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच अपडेट करण्यात येणार आहे. उमेदवारांची मुलाखत ही शासनानं जारी केलेल्या नियमांनुसारच होणार आहे. कोणत्याही उमेदवाराला मास्कशिवाय कॅम्पसमध्ये येण्याची परवानगी नसेल. केवळ भारतीय नागरिक ऑनलाईन/ वैयक्तिक मुलाखतीत उपस्थित राहण्यास पात्र आहेत. उमेदवार वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखतीचा पर्याय निवडू शकणार आहेत. उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ईमेलद्वारे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे असणार आहे. मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची यादी ही https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en या वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना पडताळणीच्या उद्देशाने सामील होताना सर्व मूळ कागदपत्रे सादर करणं आवश्यक असणार आहे. अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी recruitment.dogr@icar.gov.in हे वाचा- HP Recruitment 2021: HP कंपनीमध्ये IT फ्रेशर्ससाठी मोठी नोकरीची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT ICAR DOGR Recruitment 2021
  या पदांसाठी भरती     यंग प्रोफेशनल (Young Professional II) -एकूण जागा 02
  शैक्षणिक पात्रता आनुवंशिकता आणि वनस्पतींचे प्रजनन/ कृषी. जैवतंत्रज्ञान/ जैवतंत्रज्ञान / फलोत्पादन / भाजीपाला विज्ञान यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक
  इतका मिळणार पगार 35,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी recruitment.dogr@icar.gov.in
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: