मराठी बातम्या /बातम्या /करिअर /ICAI CA Foundation Result: आजच ठरणार हजारो उमेदवाराचं भविष्य? असं चेक करा तुमचं स्कोरकार्ड

ICAI CA Foundation Result: आजच ठरणार हजारो उमेदवाराचं भविष्य? असं चेक करा तुमचं स्कोरकार्ड

असं चेक करा तुमचं स्कोरकार्ड

असं चेक करा तुमचं स्कोरकार्ड

परीक्षा देणारे उमेदवार icai.org किंवा icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी: देशातील हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) CA फाउंडेशनचे निकाल आज जाहीर करेल अशी शक्यता आहे. ICAI चे CCM, धीरज खंडेलवाल यांच्या आधीच्या विधानानुसार, निकाल 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षा देणारे उमेदवार icai.org किंवा icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. पण हा निकाल चेक कसा करावा आणि डाउनलोड कसा करावा हे जाणून घेऊया.

“मी सीए फाऊंडेशनच्या निकालाविषयीच्या सर्व अंदाजांवर विश्वास ठेवत आहे जो 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत असू शकतो. अंतिम तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. कृपया @theicai सूचनेची प्रतीक्षा करा," खंडेलवाल यांनी ट्विट केले होते.

ना जॉबला जाण्याचं टेन्शन ना बॉसचं प्रेशर; घरबसल्या कमवा तासाचे लाखो रुपये; या टॉप वेबसाईट्स बघाच

ICAI CA फाउंडेशन डिसेंबर 2022 ची परीक्षा 14 ते 20 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. संस्थेने CA फाउंडेशन परीक्षेसाठी चार सत्रे आणि चार पेपर आयोजित केले होते. ICAI निकालांसह CA फाउंडेशनसाठी टॉपर्सची यादी आणि उत्तीर्णांची टक्केवारी देखील प्रसिद्ध करेल.

कोणत्याही ट्युशन किंवा कोचिंगशिवाय MPSC क्रॅक करायची आहे ना? मग काहीही करा पण या चुका करू नका

असा चेक करा तुमचा निकाल

उमेदवार ICAI CA फाउंडेशन निकाल डिसेंबर 2022 डाउनलोड करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करू शकतात.

ICAI अधिकृत वेबसाइट, icai.org किंवा icai.nic.in ला भेट द्या.

"CA फाउंडेशन निकाल डिसेंबर 2022 डाउनलोड" लिंकवर क्लिक करा.

रोल नंबर आणि पिन नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून लॉग इन करा.

ICAI CA फाउंडेशन डिसेंबर 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल

निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करा.

SBI Recruitment 2023: तब्बल 48 लाखांचं पॅकेज; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय

उमेदवारांना त्यांचे सीए निकाल नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे देखील प्राप्त होतील. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच गुणपत्रिका विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या जातील. सीए इच्छूकांना 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज विलंब शुल्काशिवाय सबमिट करण्याची परवानगी देण्यात आली होती आणि ऑनलाइन परीक्षा अर्ज विलंब शुल्कासह सबमिट करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2022 होती. संस्थेने सीए फाउंडेशनसाठी परीक्षा देखील पूर्ण केल्या आहेत.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam result