नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने (IBPS) सरकारी बँकांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू करणार आहे. यासाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेसबाबतची (CRP-SPL-X) जाहिरात जारी करण्यात आली आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे. या निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा 26 आणि 27 डिसेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
(वाचा - Government Job: 'या' बँकेत नोकरीची संधी; उद्यापासून करता येणार अर्ज)
या पदांसाठी अर्ज करता येणार -
आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसर भरती परीक्षा 2020-21 द्वारे आयटी ऑफिसर (स्केल -1), ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (स्केल - 1), राजभाषा अधिकारी (स्केल - 1), लॉ ऑफिसर (स्केल - 1), एचआर, पर्सोनल ऑफिसर (स्केल - 1), मार्केटिंग ऑफिसर (स्केल - 1) या पदांसाठी नव्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अद्याप पदांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर भरती परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांना अधिकृत वेबसाईट ibps.in वर भेट द्यावी लागेल. या साईटवर आयबीपीएस एसओ 2021 नोटिफिकेशन (CRP-SPL-X) वर क्लिक करून संपूर्ण माहिती डाऊनलोड करता येऊ शकते. त्याशिवाय आयबीपीएस ऍप्लिकेशन पोर्टल ibpsonline.ibps.in वर आयबीपीएस एसओ 2021-22 ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करून अर्ज करता येऊ शकतो.
आयबीपीएस एसओ 2021-22 साठी 26 आणि 26 डिसेंबरला परीक्षा होईल. याचा रिझल्ट जानेवारी 2021 मध्ये लागेल. याच्या मुख्य परीक्षेचं आयोजन 24 जानेवारी रोजी होणार आहे. ज्याचा रिझल्ट फेब्रुवारी 2021 मध्ये लागेल. इंटरव्ह्यू फेब्रुवारीमध्ये होणार असून प्रोव्हिजनल अलॉटमेंट एप्रिल 2021 मध्ये होणार आहे.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.