Home /News /career /

IBPS RRB Clerk: IBPS RRB क्लर्क परीक्षेचं Score Card जारी; असा बघा तुमचा स्कोर

IBPS RRB Clerk: IBPS RRB क्लर्क परीक्षेचं Score Card जारी; असा बघा तुमचा स्कोर

विद्यार्थी आपला स्कोर ऑफिशिअल वेबसाईटवर (IBPS RRB Clerk Exam 2021 Score Card) बघू शकणार आहेत.

    मुंबई, 08 सप्टेंबर: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) नं काही 8 आणि 14 ऑगस्टला क्लर्क या पदासाठी परीक्षा घेतली होती. या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल दिनांक 3 सप्टेंबरला लावण्यात आला आहे. त्यानुसार आता मेन्स परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपले मार्क्स बघण्यासाठी Score Card (IBPS RRB Clerk Exam 2021) जारी करण्यात आले आहेत. आज हे स्कोर कार्ड जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थी आपला स्कोर ऑफिशिअल वेबसाईटवर (IBPS RRB Clerk Exam 2021 Score Card) बघू शकणार आहेत. जे उमेदवार IBPS RRB Clerk prelims exam मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ते नोंदणी क्रमांक (Application Number) किंवा रोल नंबर (Roll Number) आणि पासवर्ड (Password) किंवा जन्मतारीख (DOB) वापरून IBPS RRB Clerk Score Card  डाउनलोड करू शकतात. उमेदवार  IBPS RRB Clerk 2021 च्या स्कोअर कार्डमध्ये कट ऑफ (Cut-Off) तपासू शकतात. यामध्ये विभागीय आणि एकूण कट ऑफ दोन्ही देण्यात आलेले आहेत. त्यानुसार विद्यार्थी आपला स्कोर चेक करू शकतात. हे वाचा - येस्स! आता महिलांनाही मिळणार NDA मध्ये प्रवेश, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय Score Card असं करा डाउनलोड IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या. IBPS RRB Office Assistant prelims score card या होमपेजवरच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर (Roll Number) आणि जन्मतारीख किंवा संकेतशब्द (Password) एंटर करा आणि SUBMIT वर क्लिक करा. यानंतर तुमचं Score Card स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला हवं असल्यास डाउनलोड करून ठेवा. कधी होणार Mains परीक्षा? IBPS RRB Clerk 2021 Mains परीक्षा  17 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. IBPS लवकरच अधिकृत वेबसाइटवर या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Entrance exam

    पुढील बातम्या