• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Government Jobs: IBPS मध्ये 4135 जागांसाठी भरती, Graduate उमेदवारांना या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Government Jobs: IBPS मध्ये 4135 जागांसाठी भरती, Graduate उमेदवारांना या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

देशातील विविध सरकारी बँकामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदाच्या 4135 जागांसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : देशातील सरकारी बँकामध्ये ( Nationalized Banks) सध्या रिक्त पदं आहेत. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण अधिक आणि पदभरती बराच काळ न केल्याने या बँकामध्ये कर्मचारी संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम बँक सेवेवर होत आहे. त्यामुळे सध्या सरकारी बँकांमध्ये पदभरती मोहीम राबवण्यात येत आहे. याचा फायदा कोरोनामुळे नोकरी गेलेल्या तसंच या काळात नोकऱ्या मिळत नसल्याने परिस्थिती सुधारण्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या तरुण पिढीला होणार आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणाईसाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील विविध सरकारी बँकामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) पदाच्या 4135 जागांसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. बँकिंग ऑफ पर्सोनल सिलेक्शनने (IBPS) राष्ट्रीय बँकांमधील या सरकारी नोकऱ्यांसाठी अधिसूचनाही जारी केली आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक या बँकांमध्ये ही भरती होणार आहे.

महावितरण भरती: 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 69 जागांसाठी नोकरीची संधी

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार (Graduate Candidate) या पदासाठी अर्ज करू शकतात. याकरता IBPS च्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज (Online Application) करता येईल. 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Main Exam) आणि मुलाखतीच्या (Interview) आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

TCS Recruitment 2021: फ्रेशर्सला टीसीएसमध्ये काम करण्याची संधी, असं करा अप्लाय

या पदांसाठी असा भरा अर्ज - सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा आणि रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा. नंतर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा आणि आपला यूजर आईडी, पासवर्ड तयार करा. लॉग-इन करून अर्ज भरा. त्यानंतर शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. या अर्जाची एक प्रत डाउनलोड करून ठेवा. अर्जात कोणतीही चूक असेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अधिसूचना नीट वाचून अर्ज भरावा असं आवाहन आयबीपीएसनं केले आहे. कोरोना साथीमुळे बेरोजगारी वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात युवा वर्ग चिंतेत आहे, त्यांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. यामुळे उत्तम नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
First published: