• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • IBPS Clerk Exam 2021: लिपिक पदासाठीची परीक्षा प्रक्रिया तूर्तास थांबवली; 'हे' आहे कारण

IBPS Clerk Exam 2021: लिपिक पदासाठीची परीक्षा प्रक्रिया तूर्तास थांबवली; 'हे' आहे कारण

जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही परीक्षा प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 14 जुलै: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये लिपिक पदासाठी पदभरती परीक्षा (IBPS Clerk Exam -2021) घेण्यात येणार होती. मात्र प्रादेशिक भाषांमध्ये (Regional Language) परीक्षा घेण्याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही परीक्षा प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील (Government Banks) लिपिक पदाच्या भरतीसाठी परीक्षा प्रक्रिया राबवली जाणार होती. मात्र आता अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) अनिश्चित कालावधीसाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जुलै 2019 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या इंग्रजी, हिंदी तसेच स्थानिक भाषांमध्ये घेतल्या जातील असे आश्वासन संसदेत दिले होते. मात्र आता प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील लिपिक संवर्ग पदभरतीसाठी परीक्षा न घेण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयाने इन्स्टिटयुट ऑफ बॅंकिंग कर्मचारी सिलेक्शनला (IBPS) दिले असल्याचे झी बिझनेसच्या वृत्तात म्हटलं आहे. लिपिक संवर्गासाठी पदभरती परीक्षा या प्रादेशिक भाषांमध्ये घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार एक समिती (Committee) स्थापन करण्यात आली असून ही समिती या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालणार, असल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे वाचा - Job Alert: चंद्रपूर जिल्हा परिषदेत CA पदाच्या तब्बल 389 जागांसाठी भरती `प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घ्या` लिपिक संवर्गातील पदभरतीसाठीच्या परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांनी केली होती. भारतीय घटनेनुसार 22 भाषांना मान्यता आहे. प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमधील पदभरती परीक्षेचे आयोजन हे इंग्रजी आणि हिंदी भाषेव्यतरिक्त स्थानिक भाषांमध्ये केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जुलै 2019 मध्ये संसदेत दिले होते. स्थानिक युवकांना समान रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने 2019 मध्ये आरआरबीमध्ये ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल वनची परीक्षा कोकणी, कानडीसह 13 भारतीय भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो इच्छूक अर्जदारांना परीक्षेसाठी थोडा जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती आपल्या शिफारशी 15 दिवसांत सादर करणार असल्याचे, अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आयबीपीएसच्यावतीने सध्या होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. समितीच्या शिफारशी आल्यानंतर या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. आयबीपीएसने नुकतीच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये लिपिक ग्रेडसाठी पदभरती करण्याबाबत जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषांमध्ये ही परीक्षा होणार होती.
First published: