मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंटरनेटच्या जोरावर केला UPSCचा अभ्यास, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवलं अव्वल यश

इंटरनेटच्या जोरावर केला UPSCचा अभ्यास, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवलं अव्वल यश

समस्तीपूर जिल्ह्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले धुरलक गाव आज विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

समस्तीपूर जिल्ह्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले धुरलक गाव आज विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

समस्तीपूर जिल्ह्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले धुरलक गाव आज विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

पाटना, 10 ऑगस्ट : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2019चा निकाल जाहीर झाला आहे. नागरी सेवा परीक्षेचा निकाल बिहारसाठी विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बिहारमधील बर्‍याच विद्यार्थ्यांनी यश खेचून आणलं आहे. त्यापैकीच एक विद्यार्थी राहुल मिश्रा आहे. समस्तीपूर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडेगावात राहणाऱ्या राहुलच्या यशाची संपूर्ण गावात चर्चा आहे. त्याच्या यशाचा आनंद गावात साजरा केला जात आहे.

राहुल मिश्रा यांनी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 मध्ये 202 वा क्रमांक मिळविला आहे. राहुल मिश्रा यांचा हा दुसरा प्रयत्न होता.

समस्तीपूर जिल्ह्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले धुरलक गाव आज विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. या गावचे शिक्षक बिपिन मिश्रा यांचा मोठा मुलगा राहुल मिश्रा UPSC परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाला आहे. राहुलने आयआयटीमधून अभियांत्रिकीचे पदवी घेतली आहे. यूपीएससीची तयारी सुरू करण्यापूर्वी त्याने सहा महिन्यांकरिता एका कंपनीतही काम केले आहे.

हे वाचा-ASI ची मुलगी झाली IAS; देशात 6 व्या क्रमांकावर येऊन पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न

हे यश खेचून आणण्यासाठी त्याने इंटरनेट आणि ऑनलाइन गोष्टींची मदत घेतली आहे असं राहुल म्हणाला. यामध्ये वडिलांचं खूप सहकार्य झालं. यापेक्षा आणखीन चांगला रँक हवा होता. त्यासाठी मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याचं त्यानं म्हणलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल 4 ऑगस्टला जाहीर झाला. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

First published:

Tags: Upsc, Upsc exam