IAS Success Story: दुसऱ्या प्रयत्नात आठवं रँकिंग मिळवणारी वैशाली UPSC मध्ये झाली होती नापास

IAS Success Story: दुसऱ्या प्रयत्नात आठवं रँकिंग मिळवणारी वैशाली UPSC मध्ये झाली होती नापास

वैशालीने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून 5 वर्षांचा BA-LLB कोर्स पूर्ण केला. यामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतर ती लॉ फर्ममध्ये काम करत होती पण या कामातून तिला समाधान मिळत नव्हतं. तिने IAS बनायचं ठरवलं. त्यासाठी तयारीही सुरू केली पण वैशाली पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्समध्ये नापास झाली...

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. या परीक्षेसाठी जोरदार तयारी, दिवसरात्र अभ्यास एवढी सगळी मेहनत केल्यानंतर यश मिळालं नाही तर मात्र निराशा होते. पण फरीदाबादच्या वैशाली सिंहने पहिल्या प्रयत्नात अनुत्तीर्ण होऊनही हिंमत सोडली नाही.वैशालीने पुन्हा एकदा ही परीक्षा दिली आणि या परीक्षेत तिने आठवं रँकिंग मिळवलं.

वैशाली फरिदाबादच्या वल्लभगडची आहे. तिच्या कुटुंबामध्ये वकिलीची पार्श्वभूमी आहे. तिची आई सुमन सिंह आणि वडीलही व्यवसायाने वकील आहेत. त्यांचा वारसा चालवत वैशालीनेही कायद्याचा अभ्यास केला. वैशालीचा लहान भाऊही वकीलच आहे.

कायद्याच्या परीक्षेत गोल्ड मेडल

वैशालीने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून 5 वर्षांचा BA-LLB कोर्स पूर्ण केला. यामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतर ती लॉ फर्ममध्ये काम करत होती पण या कामातून तिला समाधान मिळत नव्हतं. तिने IAS बनायचं ठरवलं. त्यासाठी तयारीही सुरू केली पण वैशाली पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्समध्ये नापास झाली.

चुकांमधून घेतला धडा

प्रिलिम्समध्ये नापास होऊनही वैशालीने हिंमत सोडली नाही. तिने या परीक्षेसाठी वेगळी रणनीती आखली. ती म्हणते, या परीक्षेच्या तयारीसाठी जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढाच वेळ उजळणीसाठीही राखून ठेवायला हवा.

या परीक्षेच्या तयारीसाठी एक वेळापत्रक बनवायला हवं. ज्यावेळी परीक्षा द्यायची आहे त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त फ्रेश असलं पाहिजे. तुम्ही ज्ञान आणि रणनीतीच्या मदतीने परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.

SBI डेबिट कार्ड रद्द करण्याच्या तयारीत, असे काढता येणार पैसे

पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही तरी वैशालीला पुढच्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची खात्री होती. वैशाली रोज 10 तास अभ्यास करायची.2017 मध्ये सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देण्याआधी फक्त 3 महिने तिने तयारी सुरू केली.

ती सांगते, ही परीक्षा द्यायची असेल तर तुमच्या बलस्थानांपेक्षाही तुमच्या कमकुवत बाजूंवर जास्त लक्ष द्या. आपल्यातल्या उणिवा दूर करून परीक्षेला सामोरे गेलात तर यश तुमचंच आहे.

=========================================================================================

VIDEO : दाभोलकर हत्येमागच्या सूत्रधाराला बेड्या कधी?

Published by: Arti Kulkarni
First published: August 21, 2019, 7:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading