हैदराबाद, 26 जुलै: मुलीचा जन्म म्हणजे चूल आणि मूल किंवा ओझं असं समजलं जाणाऱ्या कुटुंबात आणि समाजात सगळ्यांचा विरोध पत्करून मेहनतीनं IAS होण्याचं स्वप्न तरुणीनं साकार केलं. हैदराबादची रहिवासी जमील फातिमा जेबा हिने UPSC 62 वा क्रमांक मिळविला आहे. हे यश मिळविण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सामान्य मुलींप्रमाणेच, जेबालासुद्धा घरातील लोकांकडून आणि समाजाकडून विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थितीत तिने ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत हार मानणार नाही असा निर्णय घेतला होता.
सेंट फ्रान्सिस महाविद्यालयातून एमबीए पूर्ण केल्यानंतर झेबाने यूपीएससीची तयारी करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी कोचिंग क्लासचीही मदत घेतली.
पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना जेव्हा अपयश आलं तेव्हा नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणी आजूबाजूच्या लोकांनी घरच्यांना लग्न करून देण्याबाबत सांगितलं. माझ्याकडून काही होणार नाही त्यामुळे लग्न करावं असे टोमणे प्रत्येकानं ऐकवले. माझ्या प्रत्येक कठीण परिस्थितीच्या काळात एक मात्र होतं. आई-वडिलांनी माझी खूप मोठी साथ दिली.
हे वाचा-रद्दीतली पुस्तकं वाचून झाले IPS, इंद्रजित यांच्या संघर्षाची कहाणी
'इतका सगळा ताण असतानाही मी माझ्या निश्चयावर ठाम होते. हे मी करू शकते असं पुन्हा पुन्हा मनाला बजावत होते. माझ्या निर्णयावर आणि मनावर माझा पूर्ण विश्वास होता. हाच यशाचा खरा मूलमंत्र असतो, आपण आपल्या मनाशी ठाम आणि सकारात्मक असायला हवं. तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं. 2018 च्या UPSC परीक्षेत 62 वा क्रमांक मिळाला आणि स्वप्न साकार झाल्याचा आनंद खूप मोठा होता', अशी भावना जमील फातिमा जेबाने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.