मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: कधीकाळी रेल्वे स्टेशनवर होते कुली; एका मेमरी कार्ड आणि हेडफोन्सवर अभ्यास करून झाले IAS

Success Story: कधीकाळी रेल्वे स्टेशनवर होते कुली; एका मेमरी कार्ड आणि हेडफोन्सवर अभ्यास करून झाले IAS

आज आम्ही तुम्हाला कठोर परिश्रम घेत जिद्दीनं यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी बनलेल्या एका तरुणाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला कठोर परिश्रम घेत जिद्दीनं यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी बनलेल्या एका तरुणाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला कठोर परिश्रम घेत जिद्दीनं यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी बनलेल्या एका तरुणाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 जानेवारी:  भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचं अनेक तरुणी-तरुणींचं स्वप्न असतं. यासाठी अनेक तरुण रात्रंदिवस मेहनत घेतात. मात्र अगदी मोजक्या तरुणांचं हे स्वप्न प्रत्यक्षात येतं. यूपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण मानली जाते. त्यामुळे या परीक्षेत यशस्वी होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. जे युवक-युवती ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच खडतर आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतो. आज आम्ही तुम्हाला कठोर परिश्रम घेत जिद्दीनं यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी बनलेल्या एका तरुणाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.

अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते गड्यांनो, 10वी पास असाल तर रेल्वेत अर्जाची उद्याची शेवटची तारीख; लगेच करा अर्ज

हा युवक रेल्वे स्टेशनवर कुली अर्थात हमालाचे काम करत होता. पण कष्टाच्या जोरावर त्याने केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आयएएस परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. जवळ पैसे नसल्याने पुस्तक घेऊ न शकलेला हा युवक रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फायच्या मदतीने अभ्यास करून केपीएससी केएएस परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आपल्याला सरकारी नोकरीच करायची हे त्याचं स्वप्न त्याने अत्यंत मेहनतीनं पूर्ण केलं आहे. या युवकाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया. `झी न्यूज`ने याविषयीची माहिती दिली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेत जाणं खूप कठीण आहे. पण केरळ येथील एका हमालानं केरळ लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होण्यात तसेच आयएएसमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. केरळ येथील श्रीनाथ के. या युवकानं रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या फ्री वायफायच्या मदतीने केपीएससी केएएस परीक्षेत यश मिळवलं आहे. मुन्नार येथील रहिवासी असलेल्या श्रीनाथनं कोचीन रेल्वे स्टेशनवर कधीकाळी हमाल म्हणून काम केलं आहे. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आयुष्याची आकांक्षा बाळगून श्रीनाथने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

महिन्याचा तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त पगार आणि थेट अधिकारी होण्याची संधी; करा अप्लाय

श्रीनाथ के. हा रेल्वे स्टेशनवर अधिकृत हमाल म्हणून काम करत होता. पण हमालीतून मिळणारं उत्पन्न कुटुंबाच्या पालनपोषणासाठी पुरेसं नाही,असं त्याला 2018 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी जाणवलं. त्यावेळी त्याला एक वर्षाची मुलगी होती. मुलीचं बालपण चांगलं असावं या विचारानं त्यानं अजून काही चांगल्या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. यातून त्याने सरकारी नोकरीसाठी परीक्षा देण्याचा विचार पक्का केला.

काम आणि जबाबदारीमुळे श्रीनाथला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. 2016 मध्ये रेलटेल आणि गुगलने भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय सुविधा सुरू केली. यामुळे श्रीनाथला कामासोबत अभ्यास करणं सोपं झालं. ऑडिओबुक आणि व्हिडिओ डाउनलोड करून त्याने काम करत केपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी कोचिंग क्लास, एक्स्ट्रा क्लास, पुस्तकांवर मोठा खर्च करतात. याउलट श्रीनाथने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातून मेमरी कार्ड, स्मार्टफोन आणि ईयरफोन खरेदी केले. तयारी पूर्ण झाल्यावर त्याने ग्राम सहाय्यक पदासाठी केरळ लोकसेवा परीक्षेसाठी अर्ज भरला. या परीक्षेत त्याला 82 टक्के गुण मिळाले. श्रीनाथनची संपूर्ण कहाणी गुगल इंडियाने शेअर केली तेव्हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी 2018 मध्ये त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले. त्यानंतर श्रीनाथने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली आणि यूपीएससी सीएसईमध्ये तो चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाला. यानंतर तो आयएएस अधिकारी बनला. रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करणारा श्रीनाथ के. आयएएस ऑफिसर झाला. त्याचा हा खडतर प्रवास अन्य तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Ias officer, Success story