मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुक्लाची कहाणी

IAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुक्लाची कहाणी

यूपीएससी परीक्षेत अर्तिकीने पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवत 4 रॅँक मिळवला.

यूपीएससी परीक्षेत अर्तिकीने पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवत 4 रॅँक मिळवला.

UPSC मध्ये चौथी रँक मिळवणाऱ्या अर्तिका शुक्लाने (IAS Artika Shukla) कसा केला अभ्यास? वाचा तिची Success Story.

दिल्ली, 10 जून : अर्तिका शुक्लाचे (Artika Shukla)  दोन्ही भाऊ UPSC परीक्षा पास झाले आहेत. त्यांच्याकडूनच आरती शुक्लादेखील IAS ऑफिसर होण्याची प्रेरणा घेतली. पण आर्तिकीने मेडिकलला अॅडमिशन घेतलेली. आता ते शिक्षण तर पूर्ण करायचंच होतं. तो खडतर अभ्यास पूर्ण करून डॉक्टर म्हणून काम न करता देशसेवा (Public service) करण्याचा निर्णय घेतला. देशभरातून लाखो विद्यार्थी युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देतात. मात्र, त्यातल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना यश मिळतं. आर्तिकीने कसं जिद्दीने यश संपादन केलं... वाचा तिची Success Story.

आर्तिकाने आपलं एमबीबीएस आणि एमडी (MBBS & MD) पूर्ण केलं आहे.  लहानपणापासुनच अर्तिकी अतिशय हुशार होती. त्यामुळे तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षातच तिने आपला विचार बदलला आणि IAS ऑफिसर बनण्यासाठी UPC परीक्षेची तयारी सुरू केली. आर्तिकीचे 2 भाऊ देखील UPC परीक्षा पास झालेले आहेत.

कसा केला अभ्यास?

त्यांच्याकडूनच अर्तिकाला मार्गदर्शन मिळालं. UPSC परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्या अर्तिकीने पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवत 4 रॅँक मिळवली. अर्तिका म्हणते, प्रचंड मेहनत आणि योग्य स्ट्रॅटेजी वापरून आपण UPC पास होऊ शकतो.

(उंदीर असावा तसं सापाकडे टकामका पाहत होतं मांजर; पुढे जे घडलं ते पाहूनच उडाल)

अर्तिका सांगते, ‘परीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर सतत मेहनत घेऊन अभ्यासाची योग्य आखणी करून. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होता येतं. तिने NCERT च्या 1 ते 12 पर्यंतच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. शिवाय लिखाण आणि कौशल्य विकास याचाही अभ्यास केला. UPC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अर्तिकी शुक्लाने महत्वाचा सल्ला दिला आहे.

(इथे पाऊस तर तिथे UAE मध्ये आग ओगतोय सूर्य; 51 अंशावर पोहोचलं तापमान)

ती म्हणते, आधी UPCचा अभ्यासक्रम समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर एनसीईआरटीच्या पुस्तकांची निवड करावी. जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर उजळणीवर भर द्यावा. शिवाय प्रश्नपत्रिका लिखाणाचा सराव करावा आणि मॉक टेस्ट पेपर सुद्धा द्यावेत. योग्य दिशेने मेहनत केली तर, आपण लवकरात लवकर यूपीएससी पास होऊ शकतो. असा विश्वास अर्तिका शुक्लाने व्यक्त केलाय.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success stories, Success story, Upsc