मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IAS अधिकारी कविता रामू जपतात आपली आवड, नृत्य पाहून लोकं होतात थक्क

IAS अधिकारी कविता रामू जपतात आपली आवड, नृत्य पाहून लोकं होतात थक्क

या पदावर काम करत असताना अनेकदा स्वतःचा छंद जपणं अवघड होऊन जातं. पण एक अशी आयएएस अधिकारी आहे, तिने एक अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत असतानाच स्वतःचा छंद केवळ जोपासलाच नाही, तर त्यामध्येही नावलौकिक मिळवला.

या पदावर काम करत असताना अनेकदा स्वतःचा छंद जपणं अवघड होऊन जातं. पण एक अशी आयएएस अधिकारी आहे, तिने एक अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत असतानाच स्वतःचा छंद केवळ जोपासलाच नाही, तर त्यामध्येही नावलौकिक मिळवला.

या पदावर काम करत असताना अनेकदा स्वतःचा छंद जपणं अवघड होऊन जातं. पण एक अशी आयएएस अधिकारी आहे, तिने एक अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत असतानाच स्वतःचा छंद केवळ जोपासलाच नाही, तर त्यामध्येही नावलौकिक मिळवला.

तमिळनाडू, 08 नोव्हेंबर: भारतीय नागरी सेवांअंतर्गत (UPSC) आयएएस ( IAS ) अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी ( job ) सर्वात कठीण परीक्षा (Exam) मानली जाते. आयएएस अधिकारी होण्यासाठी प्रचंड मेहनत विद्यार्थी करताना दिसतात. अनेक आयएएस अधिकारी (IAS officers) वेगवेगळ्या कामातून ठसा उमटवतात. पण या पदावर काम करत असताना अनेकदा स्वतःचा छंद जपणं अवघड होऊन जातं. पण एक अशी आयएएस अधिकारी आहे, तिने एक अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत असतानाच स्वतःचा छंद केवळ जोपासलाच नाही, तर त्यामध्येही नावलौकिक मिळवला. त्या आयएएस अधिकारी म्हणजे कविता रामू (IAS Kavitha Ramu). पल-पल इंडिया ने याबाबत वृत्त दिलं आहे.

कविता रामू या आयएएस अधिकारी आहेत. पण पायात घुंगरू बांधून जेव्हा त्या भरतनाट्यमच्या वेशभूषेत स्टेजवर नृत्य करतात, तेव्हा त्यांचे नृत्य पाहून लोक थक्क होतात, आणि सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात गुंजतो. त्या स्वतःच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकतात. कविता रामू या तामिळनाडू केडरच्या 2002 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आज केवळ प्रशासकीय अधिकारीच नाही तर देशातील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना म्हणूनही त्या ओळखल्या जातात. देश-विदेशात 600हून अधिक स्टेज परफॉर्मन्स करणाऱ्या कविता रामू यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा आयएएस होण्याचा प्रवास खूप रंजक होता. नृत्यांगना ते आयएएस अधिकारी असा त्यांचा प्रवास जाणून घेऊया.

हेही वाचा-  Jalna Job Alert: जिल्हा निवड समिती जालना इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; थेट मुलाखतीला राहा हजर

 कविता रामू अवघ्या चार वर्षांची असताना तिच्या आईने तिला भरतनाट्यम शिकवायला सुरुवात केली. आई मणिमेगाली (Manimegali) लग्नापूर्वी अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम करीत होत्या. त्यानंतर प्रख्यात नृत्यांगना नीला कृष्णमूर्ती यांना गुरूत्व देऊन कविता रामू यांनी नृत्यातील बारकावे शिकण्यास सुरुवात केली. तामिळनाडूच्या चिदंबरम शहरात जागतिक तमिळ परिषद 1981 मध्ये भरली होती, तेव्हा कविता अवघ्या आठ वर्षांची होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात या आठ वर्षांच्या मुलीने दमदार कामगिरी केली, तेव्हा लोक चकित झाले. एवढ्या मोठ्या स्पर्धेत यशस्वी परफॉर्मन्स दिल्यानंतर कविता रामू यांचा आत्मविश्वास खूप वाढला. त्यानंतर स्टेज परफॉर्मन्स देणं नित्याचंच झालं. पुढे कविता रामू या प्रसिद्ध नृत्यांगना केजे सरसा यांना भेटल्या आणि त्यांच्या हाताखाली भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेऊ लागल्या, व बघता-बघता कविता रामू प्रसिद्ध होऊ लागल्या.

भरतनाट्यम कविता यांची आवड होती, पण त्यांच्यावर वडील आयएएस एम रामू यांचा खूप प्रभाव होता आणि त्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचे होते. कुटुंबालाही मुलगी आयएएस झालेली पाहायची होती. अशा परिस्थितीत एक मार्ग त्यांना भरतनाट्यममधील करिअरकडे नेणारा होता, तर दुसरा मार्ग त्यांना प्रशासकीय सेवेच्या तयारीकडे घेऊन जात असे. अखेर कविता रामूने दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. जेव्हा ती मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची तयारी करत होती, तेव्हा 2002 मध्ये तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली. देशातील सर्वात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षेत म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील यशाची ही आनंदाची बातमी होती. अखेर कविता आयएएस होण्यात यशस्वी झाली. कविता रामू अभ्यासात खूप हुशार होत्या. यापूर्वी 1999 मध्ये त्यांची तामिळनाडू राज्य नागरी सेवांमध्ये निवड झाली होती. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आयएएस बनल्यानंतर कविता रामू यांनी विविध पदांवर काम केलं आहे. त्यांचा दिनक्रम पहाटे पाच वाजल्यापासून योगासनाने सुरू होतो. मग त्या नऊ वाजल्यापासून ऑफिसला निघतात. रात्री आठवाजेपर्यंत घरी येतात. नोकरीतून वेळ काढून त्या नृत्याचा सराव करतात.

हेही वाचा-  Induslnd Bank Recruitment: इंडसइंड बँकेत 12वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 150 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

 आयएएस अधिकारी म्हणून काम करत असतानाच स्वतःची आवड, छंद जपणाऱ्या कविता रामू या अनेक युवतींच्या आयकॉन आहेत. आवड असल्यास सवड मिळते, असे म्हटले जाते. कविता रामू यांच्या बाबतीत हे नक्कीच लागू होत आहे.

First published:

Tags: Ias officer