मुंबई, 10 जानेवारी: आपल्यापैकी IAS ऑफिसर होण्याची इच्छा प्रत्येकाला असते. यासाठी अनेकजण मोठ्या जिद्दीनं आणि मेहनतीने अभ्यासही करत असतात. UPSC क्रॅकही करतात. मात्र असे विद्यार्थी काही वेळा IAS च्या मुलाखती दरम्यान अपयशी होतात. याचं प्रमुख कारण म्हणजे असे विद्यार्थी देशात चाललेल्या प्रश्नांची उत्तरं योग्य रितीनं देऊ शकत नाहीत. म्हणूनच मुलाखतकारांचा असा समज होतो की अशा उमेदवारांमध्ये IAS होण्याची पात्रता आणि गुण नाही. तुमच्यात एका IAS ऑफिसरचे गुण आहेत की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता नको. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत ज्या तुम्हाला असतील तर तुम्ही एक IAS होण्यायोग्य आहात की नाही हे ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा
गंभीर असणं आवश्यक
UPSC परीक्षेची तयारी करताना तुमच्यासाठी गंभीर असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गंभीर नसाल किंवा तुमचं ध्येय निश्चित नसेल तर तुम्ही वेळ वाया घालवत आहात. तुमच्या मेहनत आणि मेहनतीनेच तुम्ही यात यशस्वी होऊ शकता.
NOKIA कंपनी मुबंईत करणार या पदांसाठी भरती; ऑनलाईन पद्धतीनं लगेच करा अप्लाय
प्रामाणिकता महत्त्वाची
या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक असणं आवश्यक आहे. या परीक्षेची तयारी करणं सोपी नाही. मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर वेळापत्रक बनवा आणि त्याचे प्रामाणिकपणे पालन करा. म्हणूनच जर तुमच्यात प्रामाणिकता हा गुण असेल तर तुम्ही IAS होण्यासाठी परफेक्ट उमेदवार आहात.
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग
जर तुम्हाला समाजात किंवा आपल्या आजूबाजूला काही लोक दुःखी दिसत आतील किंवा त्यान्ना काही समस्या आहे असं दिसत असेल आणि तुम्ही त्यांना मदत करत आहात तर हा गुण तुमच्यासाठी फायद्याचा आहे. तुमच्यातील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता तुम्हाला IAS ऑफिसर बनवू शकते.
कॉमन सेन्स
कॉमनसेन्स असणं ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे. मात्र ही सर्वांमध्ये असेलच असं नाही. जर तुमच्यामध्येही कॉमनसेन्स म्हणजे कुठे, कधी आणि काय बोलावं-वागावं याची समज असेल तर तुम्ही एक परफेक्ट IAS ऑफिसर होऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Ias officer, Upsc