HSC Result 2020: परीक्षा संपण्याआधीच निकालाची चर्चा, 'या' तारखेला RESULT लागणार

HSC Result 2020: परीक्षा संपण्याआधीच निकालाची चर्चा, 'या' तारखेला RESULT लागणार

परीक्षा संपण्याआधीच बारावीच्या निकालाच्या तारखेची चर्चा होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. मागच्या वर्षी बारावीचे निकाल 28 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाले होते. यंदाही साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार असल्याची चर्चा आहे. सध्या बारावीचे पेपर सुरु झाले आहेत. ही 18 फेब्रुवारीला सुरु झाली असून 20 मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पेपर तपासणीसाठी जातील. यंदाच्या परीक्षेचे निकाल (Maharashtra State Board HSC Result 2020)साधारण 28 मे ला दुपारी 1 वाजता लागणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही परीक्षा आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणारी असते.

राज्यातील 12 लाख 5 हजार 27 विविध विषयांचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी आहेत. त्यापैकी 3 लाख 39 हजार विद्यार्थी हे मुंबईसह उपनगरांमधील आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 8,53,552 विद्यार्थी तर 6,61,325 विद्यार्थिनींचा समावेश आहे.

हेही वाचा-पेपर हातात आल्यावर Blank व्हायला होतं? घाबरू नका वापरा 7 टिप्स

राज्यस्तरावर 10 आणि प्रत्येक जिल्ह्यात एक समूपदेशक नेमण्यात आले आहेत. यासोबत परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि भरारी पथक नेमण्यात आलं आहे. हे भरारी पथक परीक्षा केंद्रावर त्या कालावधीमध्ये चेकिंग करणार आहेत. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व मंडळांच्या helplibes 24 तास सुरु राहणार आहेत.

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही साधारण 28 किंवा 29 मे रोजी निकाल लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल लागतो त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही हा निकाल लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहेच पण विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

हेही वाचा-परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवा 7 गोष्टी

First published: February 20, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या