मुंबई, 03 ऑगस्ट: महाराष्ट्र मंडळाचा बारावीचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) आज 03 ऑगस्टला जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र यंदाच्या निकालात दहावीच्या निकालात अव्वल ठरलेला विभागच समोर आहे.
दहावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली होती. राजूदातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला होता. त्यानुसार आता बारावीतही कोकण वोभाग्न आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.81 टक्के लागला आहे.
सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे. इतर विभागांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत.
विभागानुसार निकालाची टक्केवारी
पुणे विभाग - 99.75
नागपूर विभाग - 99.62
औरंगाबाद विभाग - 99.34
मुंबई विभाग - 99.79
कोल्हापूर विभाग - 99.67
अमरावती विभाग - 99.37
नाशिक विभाग - 99.61
लातूर विभाग - 99.65
कोकण विभाग - 99.81
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.