मुंबई, 21 डिसेंबर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (HSC Exam time table) जाहीर करण्यात आले आहे. याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन केली आहे. त्यानंतर मंडळाकडून सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले होते. पण, आता लाट ओसरल्यामुळे परीक्षा होणार आहे. 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाकडून परीक्षेचं प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
असं आहे वेळापत्रक
4 मार्च - इंग्रजी
5 मार्च - हिंदी
7 मार्च - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
8 मार्च - संस्कृत
10 मार्च - फिजिक्स
12 मार्च - केमिस्ट्री
14 मार्च - माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
17 मार्च - बायोलॉजी
19 मार्च - जियोलॉजी
विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) बुधवार 4 मार्च 2022 पासून ते बुधवार 30 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) मंगळवार 15 मार्च 2022 पासून ते सोमवार 4 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून 2022 च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.