HSC exam news: बारावीच्या Hall Ticket बाबत बोर्डाचा निर्णय; कसं मिळेल ऑनलाइन?

HSC exam news: बारावीच्या Hall Ticket बाबत बोर्डाचा निर्णय; कसं मिळेल ऑनलाइन?

HSC board exam: कोरोनाचा प्रकोप पाहता विद्यार्थ्यांना हॉलतिकिट ऑनलाइन (class XII hall ticket online ) पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंडळाचे संकेतस्थळ www. mahasscboard.in वर हॉलतिकिट मिळतील.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (msbshse) एप्रिल-मे 2021 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपासून (3 एप्रिल) हॉलतिकीट (HSC hall ticket online) मिळणार आहे. कोरोनाचा प्रकोप पाहता विद्यार्थ्यांना हॉलतिकिट ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंडळाचे संकेतस्थळ www. mahasscboard.in वर हॉलतिकिट मिळतील. राज्य मंडळाने गुरुवारी निवेदन प्रसिद्ध केले असून संबंधित शाळा, विद्यालये यांनी कोणतेही शुल्क न आकारता हॉल तिकिटाची प्रिंट द्यायची आहे. या बाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

हॉलतिकिटबाबत मंडळाच्या सूचना

  • सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन हॉलतिकिट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत
  • प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारु नये
  • प्रिंटवर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी
  • हॉलतिकिटमध्ये विषय, माध्यम बदल असेल तर दुरूस्तीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जावे
  • फोटो, सही, नाव यासंदर्भात दुरूस्ती असल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावी
  • हॉलतिकिट गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने Duplicate असा शेरा द्यावा
  • फोटो खराब असल्यास नवीन फोटो लावून संबंधित मुख्याध्यापक,प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी

मुंबईतून आली धक्कादायक बातमी; प्रौढांचं लसीकरण सुरू होताच लहान मुलांना शिकार बनवतोय कोरोना

राज्यात वाढत्या कोरोना प्रकोपामुळे दहावी बारावीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर होतं. मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीरा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. याचबरोबर लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासासाठी 20 मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे.

Published by: News18 Digital
First published: April 1, 2021, 4:47 PM IST

ताज्या बातम्या