मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

आणखी एका कंपनीचा नोकरदार वर्गाला दणका; ‘ही’ आघाडीची IT कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ

आणखी एका कंपनीचा नोकरदार वर्गाला दणका; ‘ही’ आघाडीची IT कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ

एचपी कंपनीचे सीईओ एन्रिक लॉरेस यांच्या घोषणेनुसार, एचपी कंपनी त्यांच्या रिअल इस्टेट फूटप्रिंट कमी करेल, आणि खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत कंपनीच्या 61,000 जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करेल

एचपी कंपनीचे सीईओ एन्रिक लॉरेस यांच्या घोषणेनुसार, एचपी कंपनी त्यांच्या रिअल इस्टेट फूटप्रिंट कमी करेल, आणि खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत कंपनीच्या 61,000 जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करेल

एचपी कंपनीचे सीईओ एन्रिक लॉरेस यांच्या घोषणेनुसार, एचपी कंपनी त्यांच्या रिअल इस्टेट फूटप्रिंट कमी करेल, आणि खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत कंपनीच्या 61,000 जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करेल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 23 नोव्हेंबर : कोरोना महामारीचा दोन वर्ष सामना केल्यानंतर जगातील सगळ्याच देशांची आर्थिक व्यवस्था हळूहळू रुळावर येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगभरात मंदीचे वारे वाहू लागले असून, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्यास सुरुवात केलीय. टि्वटरनं कर्मचारी कपात केल्यानंतर अनेक बड्या आयटी कंपन्यांनीसुद्धा कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकर्ड (एचपी)देखील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.

एचपी कंपनी पुढील तीन वर्षांत 6 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचं नियोजन करत आहे. पर्सनल कॉम्प्युटरची घटती मागणी, आणि सातत्यानं कमी होत असलेला महसूल लक्षात घेऊन कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय रोजगार कायद्याचं संरक्षण मिळणार का?

गेल्या काही दिवसांपासून अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. मेटा आणि ॲमेझॉन यांनी अंदाजे 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. ट्विटरनं त्यांच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. तर सिस्को कंपनीनं गेल्या आठवड्यात कर्मचारी कपात आणि ऑफिसची संख्या कमी करण्याची घोषणा केली. हार्ड ड्राइव्ह निर्माता सीगेट टेक्नॉलॉजी होल्डिंग्स पीएलसीनेही सुमारे 3,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. आता कर्मचारी कपात करणाऱ्या या कंपनीच्या यादीमध्ये एचपी कंपनीचीसुद्धा भर पडणार आहे.

हे आहे कर्मचारी कपातीचे कारण

एचपी कंपनीचे सीईओ एन्रिक लॉरेस यांच्या घोषणेनुसार, एचपी कंपनी त्यांच्या रिअल इस्टेट फूटप्रिंट कमी करेल, आणि खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत कंपनीच्या 61,000 जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करेल. कंपनीसाठी रिस्टक्चरिंग कॉस्ट एकूण 1 अब्ज डॉलर अपेक्षित आहे, ज्यापैकी सुमारे 60 टक्के नवीन आर्थिक वर्ष 2023 मध्ये कमी होणं सुरू होईल. एचपी कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस वार्षिक 1.4 अब्ज डॉलर वाचवण्याची कंपनीची योजना आहे.

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

दरम्यान, लॉरेसच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात 10 टक्के कॉम्प्युटर विक्री दिसून येऊ शकते. तिसऱ्या तिमाहीत जागतिक पीसी शिपमेंटमध्ये सुमारे 20 टक्के घट झाली, जी गार्टनरने 1990 च्या दशकाच्या मध्यात डेटाचा मागोवा घेणं सुरू केल्यापासूनची सर्वांत मोठी घट आहे. डेल टेक्नॉलॉजी ही कंपनी त्यांचा 55 टक्के महसूल हा केवळ कॉम्प्युटर विक्रीतून मिळवते. पण याच कंपनीनं 21 नोव्हेंबर 2022 रोजी चालू तिमाहीसाठी कमकुवत अंदाज वर्तवला असून इशारा दिला आहे की, काही ग्राहकांनी नजीकच्या भविष्यासाठी खरेदी करण्यास विलंब केला आहे.

दुसरीकडे जगभरात नोकरी कपातीचे वारे सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा नोकरदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. यामधून सावरत असतानाच आता मंदीच्या लाटेमुळे पुन्हा एकदा नोकरदारवर्ग संकटात आला आहे.

First published:

Tags: Job