मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका; करिअर बदलताना 'या' IMP गोष्टी ठेवा लक्षात

Career Tips: हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका; करिअर बदलताना 'या' IMP गोष्टी ठेवा लक्षात

करिअर बदलताना IMP Tips

करिअर बदलताना IMP Tips

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला करिअर (Tips to switch Career Easily) बदलण्यात अडचणी येणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 13 जून: बरेचदा दहावी किंवा बारावीनंतर आपण इतरांच्या म्हणण्याप्रमाणे करिअरच्या क्षेत्राची निवड (How to choose best Career after 10th & 12th) करतो. यामुळे आपल्याला त्यातच शिक्षण घेऊन नोकरी करणं आवश्यक असतं. मात्र आपल्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी नसल्यामुळे कंटाळतो आणि करिअर बदलण्याचा (How to switch career easily) विचार करतो. मात्र हे वाटतं तितकं सोपी नाही. जर तुम्हाला स्वतःचं आताच करिअर सोडून दुसऱ्या करिअरची सुरुवात (How to start new career) करायची आहे तर हे नक्कीच कठीण आहे. मात्र अशक्य नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला करिअर (Tips to switch Career Easily) बदलण्यात अडचणी येणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया. करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी अनेक वेळा असे काही निर्णय घ्यावे लागतात, जे त्यावेळी तुम्हाला फारसे फायदेशीर वाटत नाहीत. काही लोक त्यांच्या आवडीचे पालन करण्यासाठी त्यांचा व्यवसाय देखील बदलतात. मात्र, असे करिअरशी निगडीत निर्णय घेण्यासाठी मन बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. करिअर सोडून आता प्राण्यांचे Feelings ओळखते ही महिला; कमाई वाचून व्हाल थक्क
  तुमच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही काही काम विनाकारण करत असाल तर तुम्ही जास्त काळ आनंदी राहू शकणार नाही आणि मग त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि कामावर परिणाम होऊ लागतो. अशा काही टिप्स जाणून घ्या, ज्या करिअर बदलताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.
  तुम्ही करिअर बदलल्यास तुम्हाला पगार आणि पद या दोन्ही बाबतीत तडजोड करावी लागेल. व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या बाबतीतही हे होऊ शकते. कधीकधी व्यवसाय आणि स्टार्टअपमध्ये नफा मिळविण्यासाठी वेळ लागतो. या प्रकरणात, काही काळासाठी आर्थिक वर्गीकरण करा. जर तुम्हाला नोकरीच्या सुरक्षिततेची किंवा इतर गोष्टींची भीती वाटत असेल, तर तुम्हाला ज्या नवीन उद्योगात काम करायचे आहे त्या कंपनीत स्वयंसेवक म्हणून काम करा. नोकरी सोडू नका, सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे स्टार्ट अपसाठी देखील करू शकता. तुम्ही सध्या ज्या कंपनीत किंवा उद्योगात काम करत आहात त्या कंपनीच्या वरिष्ठांशी आणि संपर्कांशी तुमचे संबंध खराब करू नका. तुम्हाला त्यांची पुन्हा कधीतरी आवश्यकता असू शकते. भावी वकिलांनो, CLAT परीक्षा आली जवळ; अशा पद्धतीनं करा रिव्हिजनला सुरुवात
  तुमचा सध्याचा करिअरचा अनुभव निरुपयोगी मानू नका. काही कौशल्ये सर्वत्र आवश्यक असतात.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job

  पुढील बातम्या