मराठी बातम्या /बातम्या /करिअर /इंजिनियरिंग करून कसा केला IPS चा अभ्यास, पुणे ग्रामीणच्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्यांचा अनुभव, पाहा VIDEO

इंजिनियरिंग करून कसा केला IPS चा अभ्यास, पुणे ग्रामीणच्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्यांचा अनुभव, पाहा VIDEO

IPS ची परीक्षा देताना त्यासाठी कशी तयारी करायची आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हा अनुभव सांगितला आहे.

IPS ची परीक्षा देताना त्यासाठी कशी तयारी करायची आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हा अनुभव सांगितला आहे.

IPS ची परीक्षा देताना त्यासाठी कशी तयारी करायची आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हा अनुभव सांगितला आहे.

  मुंबई, 19 जून : आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही यश नक्की खेचून आणू शकता. IPS, IAS साठी लागणारी जिद्द आणि सचोटी कायम ठेवत अडीच वर्षात तयारी करून यशाला गवसणी घालणाऱ्या IPS अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांची यशोगाथा.

  ऐश्वर्या शर्मा या मुळच्या मध्य प्रदेशातील रहिवासी. वडीलही पोलीस खात्यात कार्यरत असल्यानं त्यांना वडील आणि किरण बेदी यांच्याकडून प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाच्या अभ्यासासोबतच शासकीय परीक्षा देण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. 2015 रोजी त्यांनी आपलं इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. 2016 मध्ये UPSC साठी पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं नाही. हार न मानता त्यांनी पुन्हा जोमानं तयारीला सुरुवात केली. 2017 रोजी परीक्षा देऊन त्यांनी देशात 168 वा क्रमांक मिळवला.

  IPS ऐश्वर्या शर्मा यांनी कसा अभ्यास केला हे सांगितलं आहे.

  - लेखी आणि मुलाखतीची तयारी करताना काही विशेष गोष्टींवर भर द्यायला हवा. लेखीसाठी जनगरल नॉलेज, सध्या सुरु असणाऱ्या घडामोडी आणि त्या प्रत्येक घडामोडींवर आपलं मत असणं आवश्यक आहे.

  - मुलाखतीसाठी व्यक्तीमत्त्व हा महत्त्वाचा मुद्द असतो. यामध्ये आपल्या बोलण्यापासून हावभावापर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या जातात. एखादं उत्तर चुकल्यानंतरही आपले हावभाव काय आहेत याकडे पाहिलं जातं. मुलाखतीला 5 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपलं शिक्षण, आपलं बॅगराऊंड (घरापापासून ते आपल्या शहर आणि राज्य), आपली आवड आणि या क्षेत्रात का काम करायचं आहे याचा अभ्यास असायला हवा.

  -अभ्यास करताना जे आपल्या आधी यशस्वी झाले आहेत त्यांचे व्हिडीओ पाहायला हवेत. जेवढ्या नोट्स उपलब्ध होतील तेवढ्या सगळ्या वाचून आपल्या नोट्स तयार करायला हव्यात. अर्थशास्त्र हा स्कोअरिंग विषय असल्यानं ऑप्शनल विषय म्हणून निवडला. ऑप्शनल विषय कोणता निवडायचा हे सिलॅबस पाहून आपण ठरवता येतं. जो विषय जास्त आवडतो तो विषय घ्यायला हवा. मला इंजिनियरिंग करूनही अर्थशास्त्र आवडत असल्यानं त्याचा अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीनं करणं शक्य झालं.

  - सुरू असणाऱ्या घडामोडी, त्याचा बारकाइन अभ्यास करायला हवा आणि त्यावर आपलं मत हवं. साधारण मी 5 तासांपासून सुरुवात केली मुख्य परीक्षेसाठी 13 ते 14 तास सलग अभ्यास करावा लागतो.

  - रमेश सिंग याचं अर्थशास्त्रावरील पुस्तक मी विषयासाठी वाचलं होतं असंही त्यांनी सांगितलं. एका विषयाला एक आठवडा असं अभ्यासाचं नियोजन होतं. प्रत्येकानं नियोजन करायला हवं. निबंध लिहिण आणि मोठ्या उत्तरांसाठी लेखनाचा सराव हवा.

  -टेस्ट सिरीजचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे आपण कुठे कमी पडत आहोत हे समजतं. NCRT ची पुस्तक वाचणं महत्त्वाचं आहे. याशिवाय इन्साइट ऑन इंडिया, यू अॅकेडमी यासारख्या वेबाईसट्सच्या मदतीनं अभ्यासक्रम आणि नोट्स दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध आहेत.

  'पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही की नैराश्य येत अशावेळी आत्मविश्वास डगमगू न देता मनापासून प्रयत्न करायचे. UPSC ची परीक्षा देताना आपल्याकडे त्यासोबत एक बॅकअप प्लॅनही तयार असयाला हवा. खूप मेहनत आणि योग्य नियोजन या दोन गोष्टी तयारी करताना महत्त्वाच्या आहेत. विषयानुसार नियोजन करायला हवं. त्यांनी जवळपासू सुरुवातील 5 ते 4 तर मुख्य परीक्षेसाठी 13 ते 15 तास अभ्यास केला. यासोबत नोट्स आधीचे पेपर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव आणि सातत्य राखायला हवं. लेटेस्ट अपडेट्स, सातत्यानं केला जाणारा प्रश्न उत्तरांचा सराव यासोबत वाचन हे सर्वात महत्त्वाचं आहे.

  IPS ऑफिसर ऐश्वर्या शर्मा यांची महाराष्ट्रात पोस्टिंग झाली. सध्या त्या दौंड इथले आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली 5 पोलीस ठाण्यांची जबाबदारी आहे.

  संपादन- क्रांती कानेटकर

  First published:

  Tags: Career, IPS officer, Upsc exam