Home /News /career /

CBSE 10th Exam: उद्याच्या इंग्लिशच्या पेपरचं टेन्शन घेऊ नका; पेपर सोडवताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

CBSE 10th Exam: उद्याच्या इंग्लिशच्या पेपरचं टेन्शन घेऊ नका; पेपर सोडवताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

CBSE परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा अभ्यास

CBSE परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा अभ्यास

आज आम्ही तुम्हाला CBSE परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा अभ्यास (How to solve English Language Paper in CBSE board Exams) कसा करावा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 26 नोव्हेंबर: देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता यंदा सीबीएसई बोर्डाची परीक्षा (CBSE term 2 Exam 2022) दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. CBSE टर्म 2 ची परीक्षा (CBSE 10th Exam Preparation) आजपासून म्हणजेच 26 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड 19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. CBSE परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोविड प्रोटोकॉलची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उद्या सीबीएसई बोर्डाचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर (CBSE Term 2 Exam English Paper) आहे. सीबीएसई टर्म 1 परीक्षेचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आला होता, तर टर्म 2 परीक्षेचा पॅटर्न सबजेक्टिव्ह ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नवीन अभ्यासक्रम आणि नवीन परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाची तयारी (CBSE Exam preparation tips) करणं आवश्यक आहे. उद्या इंग्लिशचा पेपर असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन आलं असेल. मात्र चिंता करू नका.  आज आम्ही तुम्हाला CBSE परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा अभ्यास (How to solve English Language Paper in CBSE board Exams) कसा करावा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. CBSE Exams: विद्यार्थ्यांनो, परीक्षा केंद्रावर जाण्याआधी 'या' गोष्टी आधी करा चेक
  रिडींग सेक्शन (Reading Section)
  या सेक्शनमध्ये प्रामुख्याने पॅसेजेस येतात जे वाचून विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. साधारणतः विद्यार्थ्यांना हे सेक्शन इतर सेक्शनच्या तुलनेत सोपी वाटते. मात्र तसे समजू नका. कारण पॅसेजमधील प्रश्न हे तुम्हाला थोडे बदलून किंवा वेगळ्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात. म्हणूनच दररोज अभ्यास करताना 3 ते 4 पॅसेसेज वाचून त्यामधील प्रश्नांची अचूक उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. अनेकदा विद्यार्थी प्रश्नातील कठीण शब्द शोधून पॅसेज न वाचताच तो शब्द पेसेजमध्ये शोधून उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही पद्धत चुकीची आहे. जर तो शब्द पॅसेजमध्ये 4 ते 5 वेळा असेल तर तुमचं उत्तर चुकू शकतं. म्हणून कधीही पॅसेज पूर्ण वाचूनच उत्तरं लिहा. रायटिंग आणि ग्रामर (Writing & Grammar) या सेक्शनमध्ये प्रामुख्यानं लेटर लिहिणे, स्टोरीज लिहिणे, नोटीस लिहिणे या प्रकारचे प्रश्न येतात. अनेकदा विद्यार्थी अशा प्रश्नांना घाबरतात. शब्दसंग्रह आणि विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या सेक्शनमध्ये कमी मार्क्स मिळतात. मात्र चिंता करू नका. दररोज एकतरी लेटर लिहायची सवय लावा. अभ्यास करताना कोणालाही एक फॉर्मल आणि एक इंफॉर्मल लेटर लिहून बघा. यामुळे तुमचा शब्दसाठा वाढेल आणि तुम्ही वाक्यरचना करू शकाल. तसंच इंग्रजी विषयात ग्रामरला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक पॅसेजच्या नंतर ग्रामरवर आधारित प्रश्न असतात. त्यामुळे ग्रामरकॅच रोज सराव करणं आवश्यक आहे. दररोज प्रत्येक प्रकारच्या ग्रामरच्या प्रश्नांचा सराव करा. यामुळे तुम्हाला भरपूर मार्क्स मिळू शकतात. Talathi Bharti 2022: तलाठी परीक्षेसाठी अभ्यास करताय? अशा पद्धतीनं करा तयारी
  विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की नियमित सराव आणि रिव्हिजन केल्याशिवाय इंग्रजी परीक्षेत चांगले गुण मिळवणे शक्य नाही. आपल्या चुकांचे विश्लेषण करण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका लिहून बघा आणि परीक्षेत अधिक चांगले करण्यासाठी सुधारण्याचा प्रयत्न करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022

  पुढील बातम्या