मुंबई, 30 डिसेंबर : एमपीएससी संयुक्त परीक्षेची (MPSC Combined Exam) तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना इतिहासाचा अभ्यास कसा करावा? हा प्रश्न भेडसावत असतो. इतिहासात स्कोर येत नाही. हा विषय सोडून द्यायचा तो पुस्तकातून पूर्ण होत नाही, असे अनेक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये पसरलेले पाहायला मिळतात. इतिहास गोष्ट स्वरुपात असल्याने तो लक्षात ठेवायला आणि समजायला इतर विषयांच्या तुलनेत सोपा जातो हे देखील सत्य आहे. ठराविक पुस्तकांचा अभ्यास, वारंवार उजळणी आणि शेवटी इतिहासाची गोडी निर्माण केल्यास इतिहासात खूप चांगले मार्क मिळू शकतात. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि, एमपीएससी संयुक्त परीक्षेसाठी इतिहासाची तयारी कशी करावी?
इतिहासाचा अभ्यास केवळ तथ्य (Facts) आणि घटनामालिका पाठ करून पूर्ण होत नाही. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो, पण त्यासाठी केवळ पाठांतर करून भागणार नाही. घटनांमधील परस्परसंबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात आणि लक्षात राहतात. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. मात्र, काही समाजसुधारक व स्वातंत्र्यसनिक यांचे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचा अतिरिक्त अभ्यास गरजेचा आहे.
अभ्यासक्रम समजून घेणे महत्वाचे
आयोगाने संयुक्त परीक्षेसाठी आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्याक्रमात समावेश केला आहे. विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास असा उल्लेख केल्यामुळे परिक्षार्थींनी जास्तीत जास्त भर हा महाराष्ट्राच्या इतिहासावर द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुर्वमध्ये इतिहासावर 15 प्रश्न विचारले जातात. त्यापैकि 10 ते 11 प्रश्न हे फक्त महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात. यावरुन याचं महत्व समजू शकता.
इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सतराशेसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा ठराविक एकादोन पुस्तकांचाच अभ्यास करा. म्हणजे गोंधळ होणार नाही. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कठारे किंवा गाठाळ यापैकी एक निवडा तर भारताच्या इतिहासासाठी ग्रोव्हर किंवा कोळंबे किंवा समाधान महाजन यापैकी एकच पुस्तक निवडा व त्यांची वारंवार उजळणी करा.
कॉलेजला असताना MPSC चा अभ्यास कसा करायचा?
महाराष्ट्राचा इतिहास
संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्याक्रमात भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा असा उल्लेख आहे त्यामुळे भारताच्या इतिहासाची ‘भारताचा इतिहास‘ या घटकाच्या खोलात जाण्याची गरज नाही. परंतु, महत्वाच्या बाबींसाठी माहिती असणे आवश्यक असते.
भारताच्या इतिहासाचा सविस्तर अभ्यासक्रम
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना साधारण दोन भाग करता येऊ शकतात.
1) 1857 पूर्वीचा इतिहास
2) 1857 नंतरचा इतिहास
पूर्व परीक्षेत 1857 पूर्वीचा भागावर प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे तो भाग वगळला तरी चालेल. 1857 नंतरचा इतिहास या भागांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. 1857 ते 1947 पर्यंतच्या इतिहास व्यवस्थित करावा.
या भागांमधील खालील उपघटकांची तयारी व्यवस्थित करावी
गवर्नर जनरल व कायदे (1773-1947)
1857 चा उठाव.
1857 चे नंतरचे महत्वाचे उठाव. शेतकरी, आदिवासी इ.
महत्वाच्या राष्ट्रीय संघटना ( वंगभंग प्रकाशीका सभा ते क्रॉग्रेस)
इंडियन नॅशनल क्रॉग्रेस व महत्त्वाची अधिवेशने.
मवाळ व जहाल गटांची वाढ व त्यांचे राजकारण.
महत्त्वाच्या राष्ट्रीय चळवळी : स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चले जाव चळवळ इ.
भारतातल्या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी : उदा. ब्राम्हों समाज, आर्य समाज
क्रांतिकारी व साम्यवादी चकवळ
10 वी, 12 वीनंतर MPSC, UPSC परीक्षांची तयारी करावी का?
महाराष्ट्राचा सविस्तर अभ्यासक्रम
सर्वाधिक प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर येतात. त्यांची संख्या 10 ते 11 एवढी असते. त्यामुळे अभ्यास करताना सर्वाधिक भर हा महाराष्ट्राच्या इतिहासावर करावा.
शिक्षण, वृत्तपत्रे व पारंभीक प्रशासन
या घटकावर हमखास प्रश्न
महत्वाची वृत्तपत्रे त्यांचे संपादक व त्यांची भूमिका लक्षात घेणे.
वुडसच्या खलित्यापासून स्वातंत्र्यपर्यंत शिक्षणाची पार्श्वभूमी लक्षात घेणे.
महत्वाचे कायदे – महाराष्ट्रातील व्यक्तींची भूमिका ई.
राष्ट्रवादाचा उदय :
1857 पूर्वीचे महाराष्ट्रातील महत्वाचे उठाव :
उमाजी नाईक
रामोशी
फडके इतर महत्वाचे व्यक्तीचे उठाव
कोळ्यांचेचे उठाव
भिल्लांचे उठाव
1857 चा उठाव व महाराष्ट्र
महाराष्ट्रातील संघटना
बॉम्बे असोशीयन.
पुना सार्वजनिक सभा.
आयएनसी
भारत सेवक सभा. – इ.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र.
मवाळ व जहाल कालखंड.
स्वदेशी चळवळ.
असहकार चळवळ.
साविनय कायदेभंग.
चले जाव. इ.
पूर्णवेळ नोकरी करुन UPSC, MPSC मध्ये यश मिळवता येतं! फक्त..
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी
अभिनव भारत
चाफेकर
चळवळ इ.
महाराष्ट्रातील समाजसुधारणा
सामाजिक चळवळ – महात्मा फुले व शाहू महाराज
दलित चळवळ – आंबेडकर , वि. रा. शिंदे
ब्राम्हणेत्तर – शाहू महाराज, जेधे, जवळकर, भास्करराव जाधव ई.
शैक्षणिक चळवळी – भाऊराव पाटील ई.
शेतकरी व कामगार चळवळी. इ.
समाजसुधारक व इतर महत्वाच्या व्यक्तींची भूमिका
सर्वाधिक प्रश्न या घटकावर विचारले जातात.
महत्वाच्या समाजसुधारकांसोबत महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक इ. क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे कार्य व योगदान यांवरती प्रश्न विचारले जातात.
MPSC परीक्षेत चालू घडामोडींची तयारी कशी करावी?
महत्वाचे समाजसुधारक
महात्मा फुले
शाहू महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महर्षि कर्वे
वि.रा शिंदे
न्यायमूर्ती रानडे
लोकमान्य टिळक
गोपाळ आगरकर इ.
संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा मुक्तिसंग्राम
आयोग एखादा प्रश्न विचारू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, History, Mpsc examination