मुंबई, 01 फेब्रुवारी: भारतीय सैन्यात भरतीसाठी UPSC
(UPSC NDA Exam) द्वारे घेण्यात येणारी NDA परीक्षा द्यावी लागते. यासाठी उमेदवार अनेक वर्षांपासून चांगली तयारी करतात. मात्र, आता लष्करात करिअर बनवण्याची प्रक्रिया थोडीशी सोपी
(Indian Army) करण्यासाठी एक प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दिल्लीत आर्म्ड फोर्सेस प्रिपरेटरी स्कूल
(Armed Forces Preparatory School) सुरू करण्याची योजना सुरू आहे. त्यामुळे योजना तर प्रत्यक्षात अमलात आणली तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही सैन्याचं प्रशिक्षण (How to get admission in Army school) मिळू शकणार आहे.
या शाळेअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य भरतीसाठी
(how to get job in Army) तयार केले जाईल. ही शाळा 2022-23 या शैक्षणिक सत्रात सुरू केली जाऊ शकते. ही शाळा
(Armed Forces Preparatory School) दिल्ली शालेय शिक्षण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त असेल आणि स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स
(School Of Specialized Excellence) अंतर्गत सुरु केली जाणार आहे. पण या शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा सैन्य भरतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नक्की कोणते विद्यार्थी पात्र असतील? कोणत्या विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
Career Tips: भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी कशी असते Selection Process? वाचा
अशी होणार विद्यार्थ्यांची निवड
सायकोमेट्रिक आणि अॅप्टिट्यूड टेस्टच्या आधारे शाळेत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंगही केले जाणार आहे. शाळा 3 वेगवेगळ्या विभागात विभागली जाईल. यामध्ये शैक्षणिक विभाग, सेवा तयारी विभाग आणि प्रशासकीय विभाग ठेवण्यात येणार आहे. या शाळेत नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नेव्हल अकादमीच्या प्रवेश परीक्षेची तयारी (Entrance Exam for Army) केली जाईल. शाळेत शैक्षणिक व मैदानी प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मीय गुणही विकसित होतील.
Railway Jobs: मध्य रेल्वेत 'या' पदांसाठी नोकरीची संधी; 'या' जिल्ह्यात मिळणार Job
हे अधिकारी देतील प्रशिक्षण
आर्म्ड फोर्स प्रिपरेटरी स्कूलचे प्रकल्प प्रमुख माजी लष्करी अधिकारी असतील. याशिवाय सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, विषयतज्ज्ञ, सैन्य कवायत प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण अधिकारी इतर अनेक पदांवर तैनात केले जातील. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.