मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! पार्ट टाइम जॉब करत असाल तरीही होता येईल बेस्ट प्रोफेशनल; फक्त हे मुद्दे Ignore करू नका

क्या बात है! पार्ट टाइम जॉब करत असाल तरीही होता येईल बेस्ट प्रोफेशनल; फक्त हे मुद्दे Ignore करू नका

आज आम्ही तुम्हाला पार्ट टाइम जॉब करताना स्वतःला प्रोफेशनल कसं बनवायचं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला पार्ट टाइम जॉब करताना स्वतःला प्रोफेशनल कसं बनवायचं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला पार्ट टाइम जॉब करताना स्वतःला प्रोफेशनल कसं बनवायचं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 जुलै: तरुण वयातच पैसे कमवणं (Earn money tips) आता सध्याच्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे बारावीनंतरच काही विद्यार्थी पार्ट टाइम जॉब्सचा (Part Time Jobs) आधार घेतात आणि आपलं शिक्षण स्वतःच्या पैशांवर पूर्ण करतात. कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ही पावलं उचलतात. तसंच फार कमी वयात काही जण तर सोशल मीडियाच्या (money earning tips from social media) माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पैसे कमावण्यास सुरुवात करतात. काही प्रोफेशनल्सही सेकंड इन्कम सोर्स (Second Income Source) म्हणून परत टाइम जॉब्स करून किंवा काही ऑनलाईन काही टास्क पूर्ण करून पैसे (How to earn Money by Part Time Jobs) कमावतात. जर तुम्हालाही अशी इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला पार्ट टाइम जॉब करताना स्वतःला प्रोफेशनल कसं बनवायचं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

Indian Army मध्ये भरती व्हायचंय ना? मग द्या NDA परीक्षा; इथे मिळेल A-Z माहिती

कार्यसंस्कृती समजून घेणं आवश्यक

अर्धवेळ नोकरीच्या विपरीत, कंपनीत काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. पार्ट टाईम जॉब करताना बहुतेक वेळा तुम्ही घरून काम करता. पण कंपनीत काम करताना तिथल्या वर्क कल्चरनुसार काम करावं लागतं. त्यामुळे अर्धवेळ नोकरी करत असतानाही तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करत आहात त्या कंपनीची कार्यसंस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्हाला काम समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यात यशस्वी होऊ शकाल. कोणतेही काम अधिक चांगले करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे असते.

तुमचीही नोकरी गेलीये का? मग अजिबात टेन्शन घेऊ नका! आधी 'या' गोष्टी ठेवा लक्षात; लगेचच मिळेल दुसरा जॉब

दबावाला घाबरू नका

सामान्यत: नियमित नोकरीच्या तुलनेत अर्धवेळ नोकरीचा दबाव कमी असतो, असे मानले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करण्याची तयारी करत असाल, तर तुम्ही दबाव हाताळायला शिकणे महत्त्वाचे आहे. असे काही वेळा असू शकतात जेव्हा तुम्हाला एका दिवसात अनेक प्रकारची कामे करावी लागतात. अशा परिस्थितीत दबावाखाली काम करण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने, जिथे तुम्ही तुमचे काम व्यवस्थितपणे करू शकाल, तिथे तुम्ही दबाव हाताळण्यास देखील शिकाल.

संतुलन राखणं महत्त्वाचं

काम करण्यापूर्वी, तुम्ही कामाच्या तासांमध्ये समतोल साधण्याची तयारी करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही मर्यादित वेळेत अधिक नफा मिळवू शकता. काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही दररोज योग्य कामाचे तास निवडल्याची खात्री करा. तुमच्याकडे घरचे काम असेल तेव्हा काम करू नका.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams