मराठी बातम्या /बातम्या /करिअर /GATE परीक्षेचं Admit Card आलं; कसं आणि कुठून कराल डाउनलोड?

GATE परीक्षेचं Admit Card आलं; कसं आणि कुठून कराल डाउनलोड?

यआयटीमध्ये (IIT) प्रवेशासाठीची गेट परीक्षा (GATE) फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध झालं आहे.

यआयटीमध्ये (IIT) प्रवेशासाठीची गेट परीक्षा (GATE) फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध झालं आहे.

यआयटीमध्ये (IIT) प्रवेशासाठीची गेट परीक्षा (GATE) फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध झालं आहे.

नवी दिल्ली, 8 जानेवारी: भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये (IIT) प्रवेशासाठीची गेट परीक्षा (GATE) फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं (Admit Cards) मुंबई आयआयटीतर्फे (IITB) आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.

गेट परीक्षेच्या अॅडमिट कार्डवर परीक्षेला बसलेल्या उमेदवाराचं नाव, परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षा कुठे होणार आहे त्या केंद्राचा पत्ता अशा प्रकारची माहिती असेल. उमेदवारांनी परीक्षेला अर्ज करताना gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जो युझर आयडी आणि पासवर्ड तयार केला होता, त्याच्याच साह्याने लॉगिन केल्यानंतर उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहेत.

उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना हे अॅडमिट कार्ड सोबत नेणं बंधनकारक आहे. तसंच, आपल्या ओळखीचं, फोटो असलेलं वैध प्रमाणपत्रही (Photo identity proof) सोबत नेणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अॅडमिट कार्ड (हॉल तिकीट) डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल?

1. इंटरनेट ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यात GATE 2021 official website असं सर्च करावं किंवा gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जावं.

2. त्यानंतर होमपेज ओपन होईल आणि त्यावर दिलेल्या GATE Login या पर्यायावर क्लिक करावं.

3. तुमचा एन्रोलमेंट नंबर आणि पासवर्ड भरावा.

4. ‘GATE admit card download’ असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करावं.

5. त्यानंतर तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसू लागेल.

6. पीडीएफ फाइल डाउनलोड करावी आणि प्रिंट काढावी.

उमेदवार एन्रोलमेंट आयडी विसरला असेल, तर खाली दिलेल्या कृती कराव्यात.

1. “Forgot Enrolment ID” असं लिहिलेल्या टॅबवर क्लिक करावं.

2. आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी द्यावा.

3. त्यानंतर एन्रोलमेंट आयडी उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आणि ई-मेलला पाठवला जाईल.

पासवर्ड विसरला असेल, तर....

1. पासवर्ड नव्याने मिळवण्यासाठी “Request for OTP” या टॅबवर क्लिक करावं.

2. त्यानंतर ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.

3. ओटीपी सबमिट केल्यानंतर उमेदवारांना नवा पासवर्ड सेट करता येईल.

First published:

Tags: Entrance exam, IIT