Home /News /career /

नुकतंच ग्रॅज्युएशन झालंय ना? मग नोकरीच्या मागे लागा; असा द्या Interview; जॉब फक्त तुमचाच

नुकतंच ग्रॅज्युएशन झालंय ना? मग नोकरीच्या मागे लागा; असा द्या Interview; जॉब फक्त तुमचाच

 Interview देताना काही महत्त्वाच्या गोष्टी

Interview देताना काही महत्त्वाच्या गोष्टी

मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगा हा प्रश्न विचारला जाईल. यावर तुम्हाला प्रभावीपणे उत्तर देणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रश्नाच्या उत्तरावर तुमची निवड होणार की नाही हे अवलंबून असेल.

    मुंबई, 01 जुलै: करिअरमध्ये (Career Tips) सातत्यपूर्ण प्रगती साधण्यासाठी काळाबरोबर पुढे जात राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे खूप मेहनती असूनही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती (How to be successful in career) करू शकत नाहीत. एवढंच नाही तर नोकरीची मुलाखत क्रॅक (How to crack Interview) करणं देखील त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही स्किल्स (Interview Skills) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमची मुलाखतीत निवड (Interview cracking Tips) होईल. तसंच मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तुमचा प्रभाव (How to make Impression during Interview) पडेल. चला तर मग जाणून घेऊया. मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगा हा प्रश्न विचारला जाईल. यावर तुम्हाला प्रभावीपणे उत्तर देणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रश्नाच्या उत्तरावर तुमची निवड होणार की नाही हे अवलंबून असेल. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर प्रभावीपणे द्या. यामध्ये स्वतःबद्दल विचारल्यास तुमच्या Resume ची कॉपी त्यांना सांगू नका. याऐवजी तुमचातील काही टॅलेन्टसबद्दल सांगा. यामुळे तुमचा प्रभाव पडण्यास मदत होईल. मुंबई विद्यापीठात 'हा' कोर्स करा अन् पहिलंच पॅकेज 5 लाखांचं मिळवा मुलाखत कोणत्याही जॉबबाबत असो यामध्ये तुम्हाला तुमच्या गुणांबद्दल सांगणं महत्त्वाचं आहे. आजकालच्या काळात जॉब मिळवण्यासाठी केवळ शिक्षणच नाहीतर तुमच्यात काही गुण देखील असणं आवश्यक आहे. यालाच स्ट्रेंथ्स म्हणतात. तुमच्यातील स्ट्रेंथ्सबद्दल सांगा हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो. त्यामुळे मुलाखत देताना स्वतःच्या गुणांबद्दल आवर्जून सांगा. मात्र गुण सांगताना अतिशयोक्ती होणार नाही ना याची काळजी घ्या. स्वतःबद्दल खरं आणि अचूकच सांगा. मुलाखत देताना मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या खासगी आयुष्यासोबत काहीही देणं घेणं नाही याची नोंद घ्या. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या बोलण्याचा कंटाळा येईल असं बोलू नका. तुमचं जे काही म्हणणं आहे ते गोष्ट सांगितल्यासारखं न सांगता पॉईंट्समध्ये सांगा. यामुळे तुम्ही किती प्रोडक्टीव्ह आहेत याची कल्पना मुलाखतकाराला येईल. ठाण्याचे मुख्यमंत्री होताच महापालिकेनं दिली खूशखबर! 'या' पदांसाठी होणार भरती मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या Resume मध्ये नाही तर तुमच्यामध्ये अधिक रस असतो. तुमचे विचार, तुमची बोलण्याची पद्धत, तुमची कामाची पद्धत या गोष्टी बघितल्या जातात. म्हणूनच संपूर्ण मुलाखतीदरम्यान कुठेही निगेटिव्ह बोलू नका. तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक ठेवा आणि विचारही तसेच ठेवा. यामुळे तुम्हाला मुलाखतीत यश नक्की मिळेल आणि भरघोस पगाराचो नोकरीही मिळेल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या