मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career as Makeup Artist: मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर या इन्स्टिट्यूटमध्ये करा अप्लाय, मोठ्या कंपन्यांमध्ये मिळेल नोकरी!

Career as Makeup Artist: मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर या इन्स्टिट्यूटमध्ये करा अप्लाय, मोठ्या कंपन्यांमध्ये मिळेल नोकरी!

चित्रपट, मालिका, टॅलेंट शोज व एकंदरीतच कलाक्षेत्राचा विस्तारलेला आवाका मेकअप आर्टिस्टच्या प्रोफेशनला बळ देत आहे. करिअर (Career As A Makeup Artist) म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहता येईल, याविषयी अधिक जाणून घेऊ या.

चित्रपट, मालिका, टॅलेंट शोज व एकंदरीतच कलाक्षेत्राचा विस्तारलेला आवाका मेकअप आर्टिस्टच्या प्रोफेशनला बळ देत आहे. करिअर (Career As A Makeup Artist) म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहता येईल, याविषयी अधिक जाणून घेऊ या.

चित्रपट, मालिका, टॅलेंट शोज व एकंदरीतच कलाक्षेत्राचा विस्तारलेला आवाका मेकअप आर्टिस्टच्या प्रोफेशनला बळ देत आहे. करिअर (Career As A Makeup Artist) म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहता येईल, याविषयी अधिक जाणून घेऊ या.

मुंबई, 9 ऑगस्ट : सध्याचा काळ प्रेझेंटेशनचा आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अंगात केवळ क्षमता आणि पात्रता असून चालत नाही, तर त्या योग्य प्रकारे दाखवूनही देता यायला हव्यात. नीटनेटकं राहणं, साजेसे कपडे, हलकासा मेकअप करून उठावदार दिसणं ही काळाची गरज आहे. फोटो, सेल्फी आणि रील्समुळे लूकबद्दल सगळेच जण आग्रही असतात. हा लूक बदलण्यात मेकअप आर्टिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सध्याचं हिट आणि हॉट प्रोफेशन आहे. चित्रपट, मालिका, टॅलेंट शोज व एकंदरीतच कलाक्षेत्राचा विस्तारलेला आवाका मेकअप आर्टिस्टच्या प्रोफेशनला बळ देत आहे. करिअर (Career As A Makeup Artist) म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहता येईल, याविषयी अधिक जाणून घेऊ या. पूर्वी मेकअप ही कधी तरी करण्याची गोष्ट होती. तो करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती असते, हेदेखील अनेकांना माहीत नव्हतं. इंटरनेटच्या क्रांतीमुळे जग जवळ आलं. मेकअपविषयीची भरपूर माहिती घरबसल्या मिळू लागली. जगभरातले मेकअपचे (Makeup) ट्रेंड्स, त्याविषयीची उत्पादनं याबद्दल सर्वकाही हातातल्या मोबाइलवर उपलब्ध झालं आहे. मेकअप आर्टिस्टची (Makeup Artist) गरज केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. छोट्या छोट्या गावांमध्येही या प्रोफेशनल्सना चांगली मागणी आहे. तसंच गावात राहूनही मेकअपचं प्रशिक्षण घेणं आता सहज शक्य झालं आहे. त्यानंतर एखाद्या मोठ्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन किंवा सलूनमध्ये नोकरी करून सुरुवात करता येते. स्वतःचा बिझनेसदेखील करता येऊ शकतो. मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी बारावीनंतर कोर्स (Courses) करता येतो. या क्षेत्रात अनुभव आणि कौशल्यांना जास्त महत्त्व दिलं जातं; मात्र एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्यासाठी शिक्षणही तितकंच महत्त्वाचं ठरतं. मेकअपमधल्या बारीकसारीक कौशल्यांच्या शिक्षणासाठी अनेक जण डिप्लोमा कोर्स करतात. हा कोर्स सहा महिने ते एक वर्षाचा असतो. यात विद्यार्थ्यांना लेटेस्ट मेकअप आणि त्वचेशी संबंधित समस्यांविषयी माहिती दिली जाते. मेकअप आर्टिस्ट म्हणून शिक्षण घेतल्यानंतर टीव्ही, चित्रपट इंडस्ट्री, सलून, प्रॉडक्शन हाउस, फॅशन इंडस्ट्री यात करिअर करता येतं. त्याशिवाय स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा पर्याय असतो; मात्र अनुभव व पैसे या दृष्टीनं अनेक जण चित्रपट उद्योगाचा पर्याय निवडतात. मेकअप आर्टिस्टची कौशल्यं मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना त्या क्षेत्राविषयी भरपूर माहिती असावी लागते. तिथे रोज ट्रेंड्स बदलत असतात. शिवाय मेकअप करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठीची कौशल्यं विकसित करावी लागतात. त्या कौशल्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. - क्रिएटिव्ह माइंड - लेटेस्ट फॅशनची माहिती - स्टाइल व पेहरावाची माहिती - उत्पादनं व त्वचेविषयी माहिती - उत्तम संभाषण कला मेकअपसाठी आता देशभरात व परदेशातही अनेक नावाजलेल्या संस्था (Institutes For Education) शिक्षण देतात. फाउंडेशन प्रोग्रॅम इन मेकअप आर्टिस्ट्री, डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरपी व मेकअप आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स असे काही कोर्सेस यासाठी उपलब्ध आहेत. मेकअपचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था - व्हीएलसीसी इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली - सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे - एशियन अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, नॉयडा - जावेद हबीब हेअर अँड ब्युटी केअर अ‍ॅकॅडमी, पुणे - आयएसएएस इंटरनॅशनल ब्युटी स्कूल, पुणे या ठिकाणी विविध कोर्सेसच्या माध्यमातून मेकअपचं शिक्षण घेता येतं. सध्या या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे उत्तम शिक्षण व मेहनतीची तयारी असेल, तर यात चांगलं करिअर करता येऊ शकेल.
First published:

पुढील बातम्या