Home /News /career /

Success Tips: करिअरचं क्षेत्र कोणताही असो यश फक्त तुम्हालाच मिळणार; कसं? इथे मिळतील टिप्स

Success Tips: करिअरचं क्षेत्र कोणताही असो यश फक्त तुम्हालाच मिळणार; कसं? इथे मिळतील टिप्स

तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही

तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर तुम्हाला यश मिळण्यापासून (How to be successful in Career) कोणीही थांबवू शकणार नाही.

  मुंबई, 24 मे: एखाद्या क्षेत्रात करिअर (Career) करायचं म्हंटलं आर त्यासाठी त्या क्षेत्रात आवड असणं महत्त्वाचं असतं. मात्र नुसती आवड असून फायदा नाही. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी (Success in Career) स्वतःमध्ये गरजेनुसार आणि वेळेनुसार काही बदल करणं आवश्यक असतं. तसंच काही चांगल्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर तुम्हाला यश मिळण्यापासून (How to be successful in Career) कोणीही थांबवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. आपला दृष्टिकोन बदला आपला दृष्टीकोन (Attitude) बदलण्यासाठी सर्वात आधी आपलं आत्म-विश्लेषण (Self Analysis) प्रामाणिकपणे करणं आवश्यक आहे. आपल्यातील कमतरता ओळखून काय बदललं पाहिजे आणि काय सुधारलं पाहिजे हे जाणून घेणं आवश्यक आहे. रोल मॉडेल निवडा तुमच्या क्षेत्रातील अशा एखाद्या व्यक्तीला तुम्हचा रोल मॉडेल (Role Model) बनवा ज्यांच्यासारखे तुम्ही बनू इच्छिता. त्यांच्याबद्दल वाचा, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. तुम्हालाही मोठ्या कंपनीत भरघोस पगाराचा जॉब हवाय? मग अशा पद्धतीनं मिळवा नोकरी
  स्वतःला ओळखा
  तुमच्यातील बदललेल्या काही सवयी तुमच्यावर कसा प्रभाव पाडत आहेत हे ओळखा. त्यानुसार तुमचं वर्तन ठेवा. कोणालाही घाबरू नका आणि कोणाशी वाईट वागू नका. स्वतःमधील चांगल्या प्रवृत्तीला जपा. चांगले मित्र निवडा तुमचे मित्र तुम्ही सुधारण्याच्या मार्गावर अडथळा आणत असतील तर मग त्यापासून स्वत: ला दूर करा. योग्य दृष्टीकोन असलेल्या व्यक्तीसह मैत्री करा. हे आपला बदलण्याचा मार्ग सुलभ करतील. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणा तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणावा लागेल, अन्यथा तुमच्या कमकुवतपणामुळे प्रत्येक आघाडीवर पराभव पत्करावा लागेल. म्हणून स्वत: वर विश्वास ठेवा की आपण प्रत्येक काम चोख करू शकता. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या विद्यार्थी जीवनात अभ्यासापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही यात शंका नाही. मात्र या वयात व्यक्तिमत्त्व विकासावरही (Personality Development) भर देण्याची गरज आहे. विद्यार्थी जीवनापासूनच रागावर नियंत्रण ठेवायला शिका. तसंच व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष द्या. यासाठी मेडिटेशन करत राहा किंवा योग करत राहा. ही सवय जीवनभर मोडू नका. विद्यार्थ्यांनो, Education Loan घेण्यासाठी 'ही' कागदपत्रं असणं आवश्यक; बघा लिस्ट
  प्रकृती सांभाळा
  तुमच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि करिअरच्या ध्येयांसोबत प्रकृतीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सकस आहार घेणे महत्त्वाचं आहे. याशिवाय झोपेची वेळ निश्चित ठेवणंही महत्त्वाचं आहे. या सवयीमुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job alert

  पुढील बातम्या