मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

अजूनही वर्क फ्रॉम होम करताय पण कामात अजिबात लक्ष नाहीये? मग प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे कराच

अजूनही वर्क फ्रॉम होम करताय पण कामात अजिबात लक्ष नाहीये? मग प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे कराच

प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे कराच

प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे कराच

जर तुम्ही अजूनही वर्क फ्रॉम होम करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता.

    मुंबई, 14 ऑगस्ट: कोरोनामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपतपर्यंत अनेकजण काम करत आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांना घरचे सर्व काम करून ऑफिसचे काम करावे लागत आहेत. ऑफिसचं काम सांभाळत असताना कर्मचाऱ्यांवर ताण येतो आहे. म्हणुनच अनेकजण प्रोडक्टीव्ह (How to be productive during WFH) काम करू शकत नाहीये. पण आता चिंता करू नका. जर तुम्ही अजूनही वर्क फ्रॉम होम करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. घर आणि कामाची जागा स्वच्छ ठेवा ऑफिसची कामे घरून करण्यासाठी, घर व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला कामाची उत्पादकता वाढवायची असेल, तर तुमचे घर आधीच व्यवस्थित ठेवा. जेणेकरून काम करताना लक्ष इकडे-तिकडे भटकणार नाही. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आणि वातावरण स्वच्छ ठेवावे लागते. गरजू विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! UGC कडून 4 स्कॉलरशिप्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरु; अशी असेल पात्रता टाइम बाउंड असणं आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन कार्यालयाचे संपूर्ण काम त्या वेळेत होईल. तसेच घरून काम आहे पण कामातून सुटी घेणेही आवश्यक आहे. जेव्हा कोणी विहित वेळापत्रक बनवून आपले कार्यालयीन काम पूर्ण करेल, तेव्हा दिलेली मुदत तर पूर्ण होईलच, पण इतर कामेही सहज आणि वेळेत पूर्ण करता येतील. ऑफिसमधील लोकांशी बोलत राहा घरून काम करताना केवळ तुमच्या कामाकडेच नाही तर ऑफिसमधील लोकांकडेही लक्ष दिले पाहिजे. तुम्ही कामावर असताना किंवा लॉगआउट करत असताना त्यांच्याशी बोलत राहा. यातून कामाचे वातावरणही चांगले राहील. याशिवाय, जर तुम्ही मध्येच थोडा ब्रेक घेत असाल किंवा काही कामामुळे काही काळ निष्क्रिय राहणार असाल तर टीम मेंबर्सना हे सांगा. ऑफिसच्या कामात कितीही बिझी असाल तरी काढू शकाल वेळ; Five-Hour Rule पाळाच योग्य कपडे निवडा घरातून काम करताना आराम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यासाठी आरामदायक कपडे निवडणे महत्वाचे आहे. कधी कधी ऑफिसच्या इमर्जन्सी मीटिंग्सही येतात, त्यामुळेच. कपडे दिसायलाही आरामदायक असावेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Work from home

    पुढील बातम्या