यशोगाथा : सामान्य परिस्थितीतून वर येत साध्या फोटोग्राफरचा मुलगा झाला भारतीय लष्करात लेफ्टनंट

यशोगाथा : सामान्य परिस्थितीतून वर येत साध्या फोटोग्राफरचा मुलगा झाला भारतीय लष्करात लेफ्टनंट

'कोशिश करणे वालो कि हार नाही होती' हे पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार शर्मा (Bhuvneshwar Sharma) या तरुणाने सिद्ध केलं आहे .

  • Share this:

चंदिगढ, 16 डिसेंबर : आयुष्यात आपल्या ध्येयासाठी पाठलाग केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यासाठी मेहनत केल्यास हे शक्य होतं. आपल्या जिद्दीपुढे आणि मेहनतीपुढे नियतीला देखील झुकावं लागतं. अशाच प्रकारची घटना हरियाणाच्या हिस्सार मधील नरेंद्र शर्मा यांचा मुलगा भुवनेश्वर कुमार शर्मा याच्या बाबतीत घडली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील भुवनेश्वर कुमार शर्मा हा तरुण जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट(lieutenant)  म्हणून रुजू झाला आहे. डेहराडूनमधून इंडियन आर्मीच्या अकॅडमीमधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शनिवारी झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांना लेफ्टनंट म्हणून गौरवण्यात आले.

एनडीएमध्ये निवड झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार शर्मा यांचं डेहरादूनमधील इंडियन आर्मीच्या अकॅडमीमध्ये (Indian Army Academy) प्रशिक्षण सुरू होतं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मिलिटरीमध्ये कॉर्प ऑफ इंजिनीअरिंगमध्ये लेफ्टनंट(lieutenant)  पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांचे वडील व्यवसायाने फोटोग्राफर(photographer) असून हिस्सारमधील लाल रस्त्यावर अनेक वर्षांपासून ते व्यवसाय करत असून त्यांची आणि संतोष शर्मा या गृहिणी(housewife) आहेत. नरेंद्र शर्मा यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. प्रशिक्षण पूर्ण करून रविवारी घरी आल्यानंतर गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.

निष्ठा आणि मन लावून देशाची सेवा करणार

भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट (lieutenant) पदावर नियुक्त झाल्यानंतर बोलताना भुवनेश्वर कुमार यांनी आपल्या आईवडिलांचे आभार मानले. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे यश मिळवू शकल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनामध्ये असल्याने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपण याठिकाणी पोहोचल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर निष्ठा आणि मन लावून देशाची सेवा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

याआधी देखील सामान्य कुटुंबातील अनेकजणांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्यामध्ये स्थान मिळवण्याच्या घटना आपण बघितल्या आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये देखील अशाच पद्धतीने अनेकांनी यश मिळवले आहे. त्यामुळे तुम्हाला देखील यश मिळवायचे असल्यास याच पद्धतीने जिद्द आणि चिकाटी जवळ बाळगणे गरजेचे आहे. एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळणार.

Published by: News18 Desk
First published: December 16, 2020, 9:03 PM IST

ताज्या बातम्या