मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Hindi Diwas 2022: हिंदी बोलताना तत-पप होत नसेल तर 'ही' क्षेत्रं आहेत करिअरसाठी Perfect; पगारही भक्कम

Hindi Diwas 2022: हिंदी बोलताना तत-पप होत नसेल तर 'ही' क्षेत्रं आहेत करिअरसाठी Perfect; पगारही भक्कम

'ही' क्षेत्रं आहेत करिअरसाठी Perfect

'ही' क्षेत्रं आहेत करिअरसाठी Perfect

आज तुम्हाला अशा काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट हिंदी बोलत असाल तर करिअर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 सप्टेंबर: आज राष्ट्रभाषा हिंदी दिवस 2022 दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. भाषेचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापसून दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. अनेक लोक आई आहेतज्यांची मातृभाषा हिंदी नाही भाषेवर प्रेम आहे आणि आदर आहे. भारतात सर्वाधिक बोलली जाणारी आणि सर्वांना समजणारी भाषा हिंदीचं आहे. बरेचदा मराठी माणसांचं हिंदी यावर टीका केली जाते. पण असेही काही लोक असतात जे मराठी असूनही तत-पप होऊ न देता परफेक्ट हिंदी बोलतात. तुम्हीही अशांपैकीच एक असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज तुम्हाला अशा काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट हिंदी बोलत असाल तर करिअर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

हिंदी शिक्षक

तुमची हिंदीवर चांगली पकड असेल तर तुम्ही शिक्षकी पेशा निवडू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाजगी किंवा सरकारी शाळा, महाविद्यालयात शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून काम करू शकता. या व्यवसायात तुम्हाला लाखोंचं उत्पन्न मिळू शकतं. मुलांना शिकवून तुमचं ज्ञानही सुधारेल. त्याचबरोबर शिक्षकाला समाजात एक वेगळाच मान असतो. त्यात तुमचं हिंदी चांगलं असेल तर तुम्हाला देशभरात कुठेही जॉब मिळू शकतो.

Google मध्ये जॉब हवाय ना? मग तुमच्या Resume मधून आताच काढून टाका 'या' गोष्टी

पत्रकारिता

पत्रकारितेच्या क्षेत्राला सध्या जगभरात प्रचंड मागणी आहे. हिंदी पत्रकारितेच्या क्षेत्रातही तुम्ही तुमचं करिअर सुधारू शकता. तुम्ही वृत्त लेखक, रिपोर्टर, अँकर, एडिटर बनू शकता. या क्षेत्रात चांगला पगारही मिळतो. देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया हाऊसमध्ये तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबईतही हिंदी पत्रकारांची गरज असते त्यामुळे राज्यात राहूनही तुम्ही हिंदी पत्रकारिता करू शकता.

लेखक

हिंदी भाषेचं चांगलं ज्ञान असलेले तरुण लेखक म्हणूनही करिअर करू शकतात. तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि तुमचं म्हणणं शब्दांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकत असाल, तर तुमच्यासाठी करिअरचा हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारात पुस्तकं लिहू शकता. उदाहरणार्थ, एक कथाकार, लेखक, कादंबरीकार, कवी देखील होऊ शकतो. यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्सही करू शकता.

MahaGenco Recruitment: तब्बल दीड लाख रुपये पगाराची संधी सोडू नका; आजच करा Apply

व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट

भारतात दरवर्षी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होतात. भारतभर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. याशिवाय परदेशी चित्रपटही प्रदर्शित होतात. अशा परिस्थितीत जर तुमची हिंदीवर चांगली पकड असेल आणि तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्ही व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करू शकता. तुम्ही तुमचा आवाज पॉडकास्ट, जाहिरात डबिंग, मूव्ही डबिंगमध्ये देऊ शकता.

ट्रान्स्लेटर

आजच्या काळात ट्रान्स्लेटरची मागणी खूप वाढली आहे. या क्षेत्रात पैसा आणि कामाची कमतरता नाही. लोक घरात बसून हिंदी भाषांतरकाराच्या नोकऱ्या करत आहेत आणि लाखोंची कमाई करत आहेत. मात्र, त्यासाठी हिंदीसोबत इतर कोणत्याही भाषेवर पकड असायला हवी. उदाहरणार्थ, इंग्रजी इ. अनेक कंपन्या हिंदी अनुवादकाच्या जागा भरतात. तसंच तुम्हाला जर मराठीही उत्तम येत असेल तर तुम्ही मराठी ते हिंदी आणि याउलट असं ही काम करू शकता.

First published:

Tags: Career, Career opportunities