Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: कोकण विभाग अव्वल तर मुंबई सर्वात कमी; कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

MH BOARD 12TH RESULT: कोकण विभाग अव्वल तर मुंबई सर्वात कमी; कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

असं शांत ठेवा मन

असं शांत ठेवा मन

Maharashtra HSC Result 2022: निकालात कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल लागला आहे तसंच कोणता विभाग अव्वल ठरला आहे याची माहिती आम्ही देणार आहोत.

    मुंबई, 08 जून:  महाराष्ट्र मंडळाचा बारावीचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) आज 08 जूनला  जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या निकालात कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल लागला आहे तसंच कोणता विभाग अव्वल ठरला आहे याची माहिती आम्ही देणार आहोत.
    राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण वोभाग्न आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 90.91% टक्के लागला आहे. इतर विभागांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates विभागानुसार निकालाची टक्केवारी पुणे-  93.61% नागपुर- 96.52% औरंगाबाद- 94.97% मुंबई- 90.91% कोल्हापूर - 95.07% अमरावती - 96.34 % नाशिक - 95.03% लातूर- 95.25% कोकण - 97.21%
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

    पुढील बातम्या