मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

बापाच्या कष्टाचं लेकीकडून चीज! वडील मुख्य न्यायाधीशांचे चालक तर मुलगी झाली जिल्हा न्यायाधीश

बापाच्या कष्टाचं लेकीकडून चीज! वडील मुख्य न्यायाधीशांचे चालक तर मुलगी झाली जिल्हा न्यायाधीश

वडील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे ड्रायव्हर होते, त्यामुळे त्यांचा कायद्याच्या जगाशी संबंध होता.

वडील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे ड्रायव्हर होते, त्यामुळे त्यांचा कायद्याच्या जगाशी संबंध होता.

वडील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे ड्रायव्हर होते, त्यामुळे त्यांचा कायद्याच्या जगाशी संबंध होता.

  • Published by:  News18 Desk
जयपूर, 23 सप्टेंबर : उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करणारे राजेंद्र गेहलोत यांच्या कौतुकास्पद आणि मोठी कामगिरी केली आहे. कार्तिकी गेहलोत असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. राजेंद्र गेहलोत यांनी चालक म्हणून 31 वर्ष सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांची मुलगी कधी न्यायाधीश होईल याची कल्पनाही केली नसेल. मात्र, आता हे खरंच घडलं आहे कारण कार्तिका गेहलोत यांनी राजस्थान न्यायिक सेवा परीक्षेत 66 वा क्रमांक पटकावला आहे असून त्यांची जिल्हा न्यायाधीश पदासाठी निवड झाली आहे. वडील मुख्य न्यायाधीशांचे ड्रायव्हर -  वडील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे ड्रायव्हर होते, त्यामुळे त्यांचा कायद्याच्या जगाशी संबंध होता. कदाचित त्यामुळेच कार्तिका यांचा राजस्थान न्यायिक सेवा (आरजेएस) परीक्षेकडे कल वाढला असावा. त्यांचे वडील आणि मुख्य न्यायाधीशांच्या कुशल मार्गदर्शनामुळे कार्तिकाला आज हे यश मिळवता आले आहे. कार्तिका यांचे म्हणणे आहे की, 31 वर्षे तिचे वडील मुख्य न्यायाधीशांचे ड्रायव्हर होते, त्यामुळे त्यांना काळा कोट आणि वकिलीचे वातावरण आवडू लागले. हे यश मिळवणे इतके सोपे नव्हते. त्यांच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. परीक्षेची तयारी करतानाचा एक किस्सा आठवून त्यांनी सांगितला की, त्या जोधपूरच्या एका कोचिंग सेंटरमध्ये तयारी करत होती. मात्र, अचानक कोचिंग सेंटर बंद करून जयपूरला हलवण्यात आले. याबाबत जेव्हा त्या कोचिंग सेंटरच्या लोकांशी बोलल्या. तेव्हा ते म्हणाले की, जयपूरला या किंवा ऑनलाईन क्लासेस घ्या. कार्तिका यांनी जेव्हा त्यांना आपली फी परत मागितली तेव्हा त्यांनी सांगितले की जर कार्तिकाने आपल्या संस्थेतून कोचिंग घेतले नाही तर कार्तिका भारतीय न्यायव्यवस्थेत जाण्याची शक्यता नाही. लोकांसाठी काय करणार? दरम्यान, कार्तिका यांनी कोरोनाच्या काळात परीक्षेची तयारी सुरू केली. त्या म्हणाल्या की, त्या काळात वातावरण खूप नकारात्मक होते, अशा परिस्थितीत स्वत:ला सकारात्मक ठेवून तयारी करणे खूप अवघड होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, शिक्षक आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणाऱ्यांना दिले आहे. या क्षेत्रात येऊन लोकांना त्यांच्या हक्कांची कायदेशीर जाणीव करून द्यायची आहे, असे त्या म्हणाल्या. कार्तिकाने जोधपूरच्या सेंट ऑस्टिन सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी गणित आणि वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. त्यानंतर कार्तिकाने जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूर येथून 5 वर्षांची BBA LLB ची पदवी घेतली. कार्तिकाचे वय 23 वर्षे आहे. हेही वाचा - प्रेरणादायी! घर सांभाळण्यासाठी पतीने सोडली लाखो रुपयांची नोकरी, अन् पत्नी कठोर परिक्षम करत झाली न्यायाधीश सोशल मीडियापासून दूरच - विशेष म्हणजे सोशल मीडियावर बरेच लोक सक्रिय असताना कार्तिकाने स्वतःला यापासून दूर ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे कोणतेही फेसबुक किंवा इंस्टाग्राम खाते नाही. लोकांशी संवाद साधण्यासाठी फक्त WhatsApp चा वापर त्या करतात, असे त्यांनी सांगितले.
First published:

पुढील बातम्या