हे जग आश्चर्यांनी आणि रहस्यमय (fascinating places) गोष्टींनी भरलं आहे. जगात अशा अनेक रहस्यमय जागा आहेत ज्या जागांविषयी आपल्या कदाचित माहितीही नसतील. यातील काही जागा मानवनिर्मित आहेत तर काही जागा निसर्गात आपोआप तयार झाल्या आहेत. काही जागी माणूस पाय सुद्धा ठेऊ शकत नाही तर काही जागी माणसांना पाय ठेवण्यास परवानगीच नाही. अशीच एक जागा आहे उत्तर कोरियामध्ये (North Korea). 'Room 39' असं या जागेचं नाव. मात्र ही जागा इतकी रहस्यमय आहे की इथे जाण्यास कोणालाच परवानगी नाही.
काही पत्रकारांच्या मते 'Room 39' ही जगातील सर्वात गुप्त स्थितीतील सर्वात गुप्त संघटनांपैकी एक आहे." 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात तयार करण्यात आलेले, 'Room 39' हे प्योंगयांगमधील वर्कर्स पार्टी इमारतीच्या आत स्थित असल्याचं म्हटलं जातं. ही जागा वर्कर्स पार्टीच्या मुख्यालयाच्या आतमध्ये असल्याचं सांगण्यात येतं.
हे वाचा - एका नारळासाठी फळ विक्रेत्यानं मोजले 6 लाख रुपये; कारण जाणून व्हाल थक्क
काही जाणकारांच्या मते, या रूममध्ये अतोनात पैसे, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान गोष्टी असू शकतात. ज्या गोष्टी छुप्या पद्धतीनं किंवा इतर वाईट मार्गांनी आणल्या जाऊ शकतात. मात्र या रूमचं रहस्य कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
काही लोकांच्या मते इथूनच जगभरातील रिसर्च चालतात आणि काही वाईट औषधं बनवली जातात. याबाबतीत अजून कोणालाही तथ्यं आढळून आलं नाही. जगाच्या विविध भागांमध्ये उपस्थित असलेल्या कंपन्यांचे हे नेटवर्क उत्तर कोरियाला वर्षाला 2 अब्ज डॉलर्सपर्यंत योगदान देण्यास सक्षम असल्याचा अंदाज आहे. असा अंदाज लावला जात आहे की,'Room 39' ही १०० डॉलरच्या "सुपरनोट" बिलांच्या अत्याधुनिक बनावटीमागे असू शकते जी अनेक दशकांपासून जारी करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.