मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Jobs Alert: अमेरिकेत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स! ही कंपनी देणार हजारो जणांना जॉब

Jobs Alert: अमेरिकेत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स! ही कंपनी देणार हजारो जणांना जॉब

नोएडा येथील आयटी (IT Company Jobs) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (HCL Technologies Ltd-HCL) पुढील पाच वर्षांमध्ये अमेरिकेत 12 हजार नवीन नोकरीची संधी (HCL Job Update) उपलब्ध करून देणार आहे.

नोएडा येथील आयटी (IT Company Jobs) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (HCL Technologies Ltd-HCL) पुढील पाच वर्षांमध्ये अमेरिकेत 12 हजार नवीन नोकरीची संधी (HCL Job Update) उपलब्ध करून देणार आहे.

नोएडा येथील आयटी (IT Company Jobs) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (HCL Technologies Ltd-HCL) पुढील पाच वर्षांमध्ये अमेरिकेत 12 हजार नवीन नोकरीची संधी (HCL Job Update) उपलब्ध करून देणार आहे.

    नवी दिल्ली, 07 डिसेंबर: नोएडा येथील आयटी (IT Company Jobs) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (HCL Technologies Ltd-HCL) पुढील पाच वर्षांमध्ये अमेरिकेत 12 हजार नवीन नोकरीची संधी (HCL Job Update) उपलब्ध करून देणार आहे. एचसीएल पुढील 36 महिन्यांत 'यूएस अर्ली करिअर अँड ट्रेनिंग प्रोग्राम' अंतर्गत 2,000 पेक्षा जास्त पदवीधरांची भरती करणार आहे. हा कंपनीच्या जागतिक न्यू व्हिस्टा कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो जगभरातील उदयोन्मुख शहरांमध्ये इनोव्हेशन आणि डिस्‍ट्रीब्‍यूशन केंद्र स्थापन करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

    कंपनीने लाँच केला अप्रेंटिसशिप प्रोग्राम

    कंपनीने अलीकडेच 'एचसीएल अप्रेंटिसशिप प्रोग्राम' (HCL Apprenticeship Program) लाँच केला आहे. ज्याद्वारे अमेरिकेमध्ये पदवीधरांसाठी नोकरी आणि पूर्ण अर्थसहाय्यित उच्च शिक्षण प्रदान करण्यात येईल. एचसीएल कंपनीने म्हटले आहे की, 'त्यांचा अमेरिकी भरती प्रोग्राम नॉर्थ कॅरोलिना, टेक्सास, कॅलिफोर्निया, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, मिनेसोटा आणि हार्टफोर्ड येथे अलीकडेच सुरू झालेल्या जागतिक वितरण केंद्रांवर लक्ष केंद्रित करेल. या प्रोग्राममध्ये क्लाउड, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डेटा विश्लेषण आणि डिजिटल इंजिनीअरिंगसह (digital engineering) आयटी समुपदेशन आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.'

    हे वाचा-Engineer उमेदवारांसाठी 70,000 रुपये पगाराची संधी; जिल्हा परिषद सोलापूर इथे जागा

    पदवीधरांसोबत काम करण्यास उत्सुक

    एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजय कुमार याबाबत माहिती देताना म्हणाले, 'एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये आम्ही तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढच्या पिढीच्या नेतृत्वाचा शोध घेऊन त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ‘एचसीएल में उदय’ (Rise at HCL) सोबत आम्ही एक कार्यक्रम ऑफर करत आहोत, जो सखोल प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. त्यामध्ये नोकरीवर असताना शिक्षण घेण्यापासून सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटपर्यंत प्रशिक्षण सामाविष्ट आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी पदवीधरांसोबत काम करण्यास उत्सुक आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

    एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies) जागतिक स्तरावर 1,87,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे. एचसीएलची जगभरात 15 ऑफिस आहेत. गेल्या 32 वर्षांपासून ही कंपनी अमेरिकेत काम करीत आहे.

    हे  वाचा-Job Tips: सर्व ठिकाणी Resume सेंड करूनही मिळत नाहीये नोकरी? मग 'या' चुका टाळा

    जगभरात जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला आहे. अनेक क्षेत्रात काम करणारे तरुण हे बेरोजगार झाले आहेत. कोरोना नियंत्रणात येत असल्याने आता हळूहळू पुन्हा एकदा नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. त्यातच आता एचसीएल कंपनीने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बेरोजगार तरुणांना याचा नक्कीच फायदा मिळू शकतो.

    First published:

    Tags: Job, Job alert, जॉब