मुंबई, 04 ऑगस्ट: कोरोनामुळे (Corona virus) सध्या बड्या कंपन्यांना नुकसान झालं आहे. मात्र देशातील काही टॉप IT कंपन्यांना (Top IT companies) मात्र प्रचंड मोठा फायदा झाला आहे. TCS, Infosys, Wipro आणि HCL संख्या कंपन्या सध्या यशाच्या शिखरावर आहेत. अशातच आता ता तीनही कंपन्यांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 2021 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे (Campus placement jobs) सुमारे 60,000 महिला उमेदवारांना (women gets job in IT company) नोकरी देणार आहे. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी महिलांनाही संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.
यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे 60 टक्के महिला उमेदवारांची नियुक्ती करण्याची HCL ची योजना आहे, या सर्व कंपन्यांपैकी सर्वात महत्वाकांक्षी HCL आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेल्या आयटी फर्मने या वर्षी 22,000 उमेदवारांना एन्ट्री लेव्हल रोलसाठी नियुक्त करण्याची योजना आखली आहे.
हे वाचा - IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी भरती; असं करा अर्ज
Wipro आणि Infosys सुमारे 50 टक्के महिला उमेदवारांना एंट्री-लेव्हल भरतीमध्ये घेण्याचा विचार करत आहेत. नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेली इन्फोसिस 2030 पर्यंत आपल्या एकूण ऑफिसेसमध्ये 45 टक्के महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास उत्सुक आहे, तर जवळपास 35,000 कॉलेज डिग्रीधारकांना नोकरी देण्याचं आणि ट्रेन करण्याचं त्यांचं लक्ष्य आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS ) 38 ते 45 टक्के महिलांना नोकरी मिलनायची शक्यता आहे . TCS मध्ये सध्या 1.85 लाख महिला एक्झिक्युटिव्ह आहेत, एंट्री लेव्हल रोलसाठी 15,000-18,000 अधिक महिला कर्मचारी घेण्याची TCS ची योजना आहे. त्यामुळे येत्या काळात कॉलेजमधून डिग्री घेऊन बहर पडणाऱ्या विद्यार्थिनींना या बड्या कंपन्यांमध्ये अनेक जॉबच्या संधी उपलब्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.