मुंबई, 30 जानेवारी: ज्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होताना अगदी हुशार माणसालाही घाम फुटतो, अशा जगातल्या सर्वांत कठीण परीक्षा कोणत्या असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या परीक्षांसाठी काही जण कोचिंगची मदत घेतात, तर काही जण अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यात यशस्वी होतात.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी पाहतात. त्यासाठी विद्यार्थी यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. ही परीक्षा अत्यंत कठीण समजली जाते. आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा हेदेखील अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. यासाठी अनेक विद्यार्थी जेईईची तयारी करतात. या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. इतर देशांमध्येही अशा प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांविषयी सर्वांना माहिती असते असं नाही. चीनमधील गाओकाओ ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. या परीक्षेचा कालावधी सुमारे नऊ तास असतो. हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांना करिअरची योग्य संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या कठीण परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरातल्या आणखी कठीण परीक्षा कोणत्या ते जाणून घेऊ या.
Career Tips: महिन्याला मिळेल लाखोंमध्ये सॅलरी; 'हा' कोर्स शून्यातून वर घेऊन जाईल तुमचं करिअर
आयएएस ऑफिसर अवनीश शरण सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी जगातल्या सर्वांत कठीण अशा पाच परीक्षांची लिस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यामध्ये दोन भारतीय परीक्षांचादेखील समावेश आहे. या आहेत आयआयटी प्रवेश परीक्षा अर्थात जेईई आणि यूपीएससी नागरी सेवा परीक्षा.
ना जॉबला जाण्याचं टेन्शन ना बॉसचं प्रेशर; घरबसल्या कमवा तासाचे लाखो रुपये; या टॉप वेबसाईट्स बघाच
अवनीश शरण यांनी ज्या सर्वांत कठीण पाच परीक्षांची नावं सांगितली आहेत, त्यात चीनची गाओकाओ परीक्षा टॉपवर आहे. चीनमध्ये ही परीक्षा दर वर्षी घेतली जाते. सुमारे एक कोटी विद्यार्थी ही परीक्षा देतात. गाओकाओ परीक्षा सुमारे नऊ तास चालते.
कोणत्याही ट्युशन किंवा कोचिंगशिवाय MPSC क्रॅक करायची आहे ना? मग काहीही करा पण या चुका करू नका
दुसऱ्या क्रमांकावर आहे आयआयटीची परीक्षा
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केलेल्या परीक्षांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आयआयटी जेईई, तर तिसऱ्या क्रमांकावर यूपीएससी नागरी सेवा परीक्षा आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर मेनसा ही परीक्षा आहे. मेनसा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराचा आयक्यू तपासला जातो. मेनसा नावाची संस्था ही परीक्षा आयोजित करते. अवनीश यांनी त्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर अमेरिकेची ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन अर्थात जीआरईचा उल्लेख केला आहे. या सर्व परीक्षा अत्यंत कठीण मानल्या जातात. अभ्यास, हुशारी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर या परीक्षांमध्ये यश मिळू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Exam