मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

परदेशात शिक्षणासाठी जाताय? मग 'या' परीक्षेबद्दल माहिती आहे ना? इथे मिळेल पात्रतेपासून पॅटर्नपर्यंत माहिती

परदेशात शिक्षणासाठी जाताय? मग 'या' परीक्षेबद्दल माहिती आहे ना? इथे मिळेल पात्रतेपासून पॅटर्नपर्यंत माहिती

'या' रिसर्च फेलोशिप कराच

'या' रिसर्च फेलोशिप कराच

जर तुम्हीही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर GRE बद्दल संपूर्ण माहिती (GRE exam full information) असणं आवश्यक आहे.

    मुंबई, 09 ऑगस्ट: परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर आता निरनिराळ्या परीक्षा द्याव्या लागतात. कोणत्याही देशात शिक्षण घ्यायचं म्हंटल तर तिथे शिक्षण घेण्यासाठी एंट्रन्स परीक्षा द्याव्या लागतात. अशा काही परीक्षांपैकीच एक परीक्षा म्हणजे GRE. Graduate Record Examinations असं या परीक्षेचं पूर्ण (Full form of GRE exam) नाव आहे. कोणत्याही देशात विशेष करून अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाताना ही परीक्षा महत्त्वाची असते. जर तुम्हीही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर GRE बद्दल संपूर्ण माहिती (GRE exam full information) असणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला GRE बद्दल सर्व माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. GRE टेस्टसाठी पात्रता GRE परीक्षेत बसण्यासाठी कोणतीही विशिष्ट अट नाही. कोणत्याही वयाची आणि शैक्षणिक पात्रता असलेली व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही ज्या संस्थेत प्रवेशासाठी अर्ज कराल त्या संस्थेच्या शैक्षणिक आणि वय-संबंधित अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. प्रचंड मेहनत करताय पण यश मिळत नाहीये, करिअरमध्ये लक्ष नाहीये? मग सावधान! तुम्हाला 'या' वाईट सवयी तर नाहीत ना? परीक्षेचा पॅटर्न पेपर 3 तास 40 मिनिटांचा असतो. पेपरमध्ये एकूण सहा विभाग असून तिसऱ्या विभागाच्या परीक्षेनंतर 10 मिनिटांचा ब्रेक दिला जातो. सामान्यतः GRE साठी संगणक आधारित चाचणी असते परंतु काही परीक्षा केंद्रांवर तुम्ही पेपर आणि पेन मोडमध्ये देखील परीक्षा देऊ शकता. परीक्षेचा Syllabus GRE चे दोन स्वरूप आहेत. एक सर्वसाधारण परीक्षा असते तर दुसरी विशिष्ट विषयांची परीक्षा असते. दोन्ही फॉरमॅटसाठी अभ्यासक्रम वेगळा आहे. GRE सामान्य चाचणीमध्ये मौखिक तर्क, परिमाणात्मक तर्क, गंभीर विचार आणि विश्लेषणात्मक लेखन कौशल्ये. GRE विषय चाचणी उमेदवाराच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रवीणतेचे मूल्यांकन करते. Engineers साठी नोकरीची बंपर लॉटरी; MAHA METRO मध्ये 2,60,000 रुपये पगाराची नोकरी; हा घ्या अर्जाचा पत्ता अशी देता येईल परीक्षा संगणकावर आधारित GRE चाचणी वर्षभर घेतली जाते. कोणताही उमेदवार दर 21 दिवसांनी आणि वर्षातून पाच वेळा GRE परीक्षा देऊ शकतो. तुम्हाला एखाद्या विशिष्ट तारखेला परीक्षा द्यायची असेल, तर त्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने तुम्हाला तुमचे 'GRE अकाउंट' तयार करावे लागेल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Education, Job

    पुढील बातम्या